"मुख्यमंत्र्यांनीच ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा आम्ही वाचू"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 08:16 AM2022-04-16T08:16:47+5:302022-04-16T08:17:19+5:30

हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसाचे वाचन करावे

Chief Minister should read Hanuman Chalisa on Matoshri otherwise we will read says ravi rana | "मुख्यमंत्र्यांनीच ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा आम्ही वाचू"

"मुख्यमंत्र्यांनीच ‘मातोश्री’वर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा आम्ही वाचू"

Next

अमरावती :

हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’वर हनुमान चालिसाचे वाचन करावे, ते करीत नसतील तर आपण स्वत: खासदार नवनीत राणा यांच्यासह ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसाचे वाचन करू, अशी अनोखी भूमिका घेत अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

विविध संकटांच्या जोखडात महाराष्ट्र अडकला असताना मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसाचे पठण केल्यास ते संकट दूर होईल, असे राणा ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले. 

दरम्यान, असल्या आव्हानाला आम्ही विचारत नाही. उद्धव ठाकरे यांनी काय वाचावे आणि काय करावे, हे सांगण्याचा त्यांना अधिकार नाही. तुम्ही मातोश्रीवर येऊन दाखवाच, असा इशारा मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे.

Web Title: Chief Minister should read Hanuman Chalisa on Matoshri otherwise we will read says ravi rana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.