मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:12 AM2021-03-22T04:12:51+5:302021-03-22T04:12:51+5:30

अमरावती : मुंबईचे पोलीस आयुक्तांद्वारा गृहमंत्र्यांवर केलेल्या १०० कोटींच्या आरोपामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा ...

The Chief Minister should resign | मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Next

अमरावती : मुंबईचे पोलीस आयुक्तांद्वारा गृहमंत्र्यांवर केलेल्या १०० कोटींच्या आरोपामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी भाजपद्वारा रविवारी सकाळी ११ वाजता येथील राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी नारेबाजी करीत गृहमंत्र्यांचा पुतळाही जाळण्यात आला.

या आंदोलनामुळे राजकमल चौकातील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात आमदार प्रताप अडसड, माजी मंत्री अनिल बोंडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, महापौर चेतन गावंडे, शहराध्यक्ष किरण पातुरकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, प्रशांत शेगोकर, प्रवीण तायडे, स्थायी समिती सभापती शिरीष रासणे, बादल कुळकर्णी, प्रणित सोनी, सुरेखा लुंगारे, विजय वानखडे, संजय नरवणे, संजय तिरथकर, अजय सारसकर, मिलिंद बांबल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The Chief Minister should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.