८०० कोटींतून चिखलदरा विकास
By admin | Published: December 28, 2015 12:15 AM2015-12-28T00:15:27+5:302015-12-28T00:15:27+5:30
चिखलदरा येथे पर्यटन विकासाला फार मोठी संधी आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांचा सिडको पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री : ९९३१ कोटींच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन
अमरावती : चिखलदरा येथे पर्यटन विकासाला फार मोठी संधी आहे. येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांचा सिडको पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या आराखड्यास येत्या एक महिन्यात मंजुरी देऊन येथील पर्यटनाला चालना देण्याची ग्वाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
जिल्ह्यातील ९,९३१ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते व जलवाहतूक तथा महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानावरुन मुख्यमंत्री बोलत होते. राज्यात विविध विकासकामे हाती घेण्यात आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मेळघाटात संपर्क व संवादाची साधने नसल्यामुळे पूर्वी अर्भक मृत्यू होत होते. मायक्रोसॉफ्ट प्रमुखांच्या अमेरिका भेटीत स्मार्ट व्हिलेज तयार करण्याची संकल्पना पुढे आली होती.
आमचे आजोळ इथले
नितीनजी एक सांगण्यास विसरले. आम्हा दोघांचे आजोळ येथे आहे. अर्धे कर्ज इकडचेही आहे. ते फेडावेच लागेल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी केवळ नागपूर आणि विदर्भावर नव्हे तर अमरावतीवर आम्हा दोघांचे विशेष लक्ष असल्याचे सांगितले.
धबधबा नव्हे समुद्र
नऊ हजार कोटींपेक्षा अधिकच निधी देऊन विदर्भातील अन्याय दूर झाला आहे. ही विकासाची गंगा नव्हे तर धबधबा असल्याचे उद्गार आ. सुनील देशमुख यांनी काढले. त्याचीच तळी उचलून धबधबा नाही, तर आम्हाला विकासाचा समुद्र मिळाल्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे म्हणाले.