चिखलदरा, खंडुखेड्यात तुफान गारपीट, पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 05:00 AM2021-02-19T05:00:00+5:302021-02-19T05:00:57+5:30

गुरुवारी दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत बोराच्या आकाराचे एवढ्या गारांचा सडा कोसळू लागला.  वन उद्यान, पांढरी, रेंजर कॉलेज व जंगलात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. नगरपालिकेचा वार्ड असलेल्या पांढरी भागात गारांचे थर दोन तासांपेक्षा अधिक वेळ साचून होते.

Chikhaldara, hailstorm in Khandukheda, hitting crops | चिखलदरा, खंडुखेड्यात तुफान गारपीट, पिकांना फटका

चिखलदरा, खंडुखेड्यात तुफान गारपीट, पिकांना फटका

Next
ठळक मुद्देपरिसर गारठला : चांदूर, धामणगाव, नांदगावात अवकाळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चांदूररेल्वे, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चिखलदरा तालुक्यात गुरूवारी दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणात कमालीचा गारवा पसरला. खुंटीवरील स्वेटर, मफलर पुन्हा निघाले. सायंकायपर्यंत वातावरणात गारवा होता. 
चिखलदरा, खंडूखेडा येथे गार 
चिखलदरा : येथे गुरुवारी दुपारी २:२० वाजताच्या दरम्यान बोराच्या आकाराच्या गारा कोसळल्या. तालुक्यातील खंडूखेडा येथे दुपारी १२ च्या सुमारास तुफान गारपीट झाली. पर्यटनस्थळी दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पर्यटन स्थळ गारठले आहे. 
गुरुवारी दुपारी अचानक काळेकुट्ट ढग दाटून आले. विजांच्या कडकडाटात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर १० ते १५ मिनिटापर्यंत बोराच्या आकाराचे एवढ्या गारांचा सडा कोसळू लागला.  वन उद्यान, पांढरी, रेंजर कॉलेज व जंगलात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. नगरपालिकेचा वार्ड असलेल्या पांढरी भागात गारांचे थर दोन तासांपेक्षा अधिक वेळ साचून होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटक सुद्धा रात्रंदिवस गरम कपडे घालण्यासह दिवसासुद्धा शेकोट्या पेटवून बसले आहेत. 
नांदगाव तालुक्यात पाऊस.
तालुक्यात कनी मिझार्पूर, नांदगाव खंडेश्वर, शिवणी रसुलापुर व परिसरातील गावात गुरूवारी सकाळी मेघगर्जनेसह पाऊस पडला. काही गावात तुरळक प्रमाणात गार पडली. हरभरा कापणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकºयांची तारांबळ उडाली. काही शेतक-यांनी सवंगनी केलेला हरभरा जमिनीवर पडून होता. गंजी झाकण्यासाठी शेतक-यांना धावपळ करावी लागली.
चांदूर रेल्वेत पावसाच्या सरी 
चांदूर रेल्वे : येथे गुरुवारी दुपारी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या. शहरात पावसाळी वातावरण तयार होऊन मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. गहू, हरभरा, भाजीपाला पिकांना पाऊस व वातावरणापासून धोका निर्माण झाला आहे.
धामणगाव तालुक्याला अवकाळी
धामणगाव रेल्वे : सहा  वर्षांपासून तालुक्यातील रब्बी हंगामातील  पिकाला अवकाळीचा फटका बसत असून गुरुवारी झालेल्या अवकाळीमुळे सोंगणी केलेला एक  हजार हेक्टरातील  हरभरा जमीनदोस्त झाला तर तीनशे हेक्टरातील गहू झालेल्या तुरळक गारपीट व वादळी पावसाने झोपला आहे.
 शेंदुरजनाघाट परिसरात गारपीट
शेंदूरजनाघाट : परिसरात गुरुवार दुपारी ३ वाजता गारपिटीसह पाऊस पडला. यामुळे गहू, चणा, एरंडी या पिकांसह संत्रापिकाचे नुकसान झाले. दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण असल्याने शेतकरी चिंतातूर झाले

चिखलदरा येथे वीज पडून बैल ठार  
चिखलदरा : गुरुवारी दुपारी झालेल्या गारपिटीमुळे तालुक्यात अतिदुर्गम असलेल्या बिच्छूखेडा, खंडुखेडा आणि भुत्रम येथे गारपीटमुळे मोठे नुकसान आहे. भुत्रुम या गावात गुरुवारी दुपारी २.१५ च्या सुमारास  वीज पडून बैल दगावल्याची माहिती चिखलद-याच्या तहसीलदार माया माने यांनी दिली. तो बैल जंगली सोमजी इवनाते यांच्या मालकीचा होता.

Web Title: Chikhaldara, hailstorm in Khandukheda, hitting crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस