चिखलदरा पर्यटनस्थळ गेले खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 10:05 PM2018-08-31T22:05:07+5:302018-08-31T22:05:43+5:30

विदर्भा$चे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन आंधळ्याचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Chikhaldara tourist spot in the pothole | चिखलदरा पर्यटनस्थळ गेले खड्ड्यात

चिखलदरा पर्यटनस्थळ गेले खड्ड्यात

Next
ठळक मुद्देपर्यटकांमध्ये संताप : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, पालिका झोपेत

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : विदर्भा$चे नंदनवन असलेले चिखलदरा पर्यटनस्थळावरील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने पर्यटकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका प्रशासन आंधळ्याचे सोंग घेऊन असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विदर्भाची एकमेव पर्यटनस्थळ असे नावलौकिक असलेले चिखलदरा रस्ता, पाणी, वीज या पायाभूत सुविधांपासून आजही वंचित असल्याचे सत्य आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी शासनाकडून पालिका सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला जातो. प्रत्यक्षात मर्जीतील अनावश्यक कामावरच तो खर्च केला जात असल्याचे सत्य आहे. ‘ठेकेदारांची नगरपालिका’ अशी बदनामीकारक ओळख पालिकेला आहे. त्यामुळे विकासकामांचा चिखलदऱ्यात बट्ट्याबोळ झाला आहे. एकमेव प्रमुख मार्गावर गेल्या तीन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे बसले पडले असताना, त्यावर मुरुम किंवा तात्पुरती डागडुजी करण्याचे धाडस नगरपालिका किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविले नाही. आंतरराज्य महामार्गाशी हा मार्ग जोडला गेला असताना, त्यावर दुरुस्ती-देखभाल खर्च लाखो रुपये दाखवण्यात आला. तरीसुद्धा अपघाताला आमंत्रण देणारे रस्ते पर्यटकांच्या जीवावर बेतले आहेत.

मुख्य चौकाची दैनावस्था
पाच हजार लोकसंख्या असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला केवळ एक मार्ग आहे. त्यावरही दोन ते तीन फुटापर्यंत खड्डे आहेत. मुख्य चौकात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. १९ नगरसेवक दिवसभर किमान १० वेळा या रस्त्यावरून जातात. त्यांना खड्ड्यांचे गचके जाणवत नाहीत का, हे मात्र कोडे आहे.

पर्यटक कर नावाची लूट
चिखलदरा पर्यटनस्थळावर वीजपुरवठ्याचा लपंडाव नेहमीची बाब झाली आहे. उन्हाळ्यात दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे सत्य आहे. कालपर्यंत विविध पॉर्इंटवरील खड्ड्यात गेलेले रस्ते दुरुस्त होत नसताना, आता मुख्य चौकासह रस्त्यावर पडलेले खड्डे एक ना धड भाराभर चिंध्या म्हणायची वेळ या पर्यटन स्थळाच्या विकासाबद्दल आली आहे. कुठलीही सुविधा मिळत नसताना घेतला जाणारा पर्यटक कर ही शुद्ध लूट ठरली आहे.

सदर मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे. पर्यटकांची गैरसोय पाहता त्यावर मुरुम टाकण्यात येईल.
- सूर्यकांत पिदुरकर, मुख्याधिकारी, न.प. चिखलदरा

खड्ड्यात मुरुम टाकल्यास चिखल होईल. यामुळे पाऊस उघडण्याची वाट पाहत आहोत.
- नितीन देशमुख
उपविभागीय अभियंता सा.बा. विभाग, चिखलदरा

Web Title: Chikhaldara tourist spot in the pothole

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.