चिखलीचा मुख्याध्यापक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:18 PM2019-02-25T23:18:42+5:302019-02-25T23:19:03+5:30

तालुक्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या चिखली येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा नराधम मुख्याध्यापक किरण कुरडकर रविवारपासून पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध पोस्को, विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Chikhli's headmaster, Pasar | चिखलीचा मुख्याध्यापक पसार

चिखलीचा मुख्याध्यापक पसार

Next
ठळक मुद्देपोस्को, विनयभंग, अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल : इतरही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : तालुक्यात आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या चिखली येथील शासकीय आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा नराधम मुख्याध्यापक किरण कुरडकर रविवारपासून पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध पोस्को, विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
कुरडकर हा रविवारी महिला अधीक्षकांकडून रजिस्टर घेऊन दोन मुलींना स्वत:च्या दुचाकीवर हरिसाल प्राथमिक आरोग्य केंद्रात परस्पर घेऊन गला होता. दरम्यान रविवारी दुपारी दिडच्या सुमारास त्यापैकी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानंतर तो पसार झाला आहे. त्याच्याविरुद्ध धारणी पोलिसांनी बाल अत्याचार लैंगिक कायदा (पोस्को), विनयभंग, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल केले. घटनेनंतर तत्काळ पोलिसांनी हरिसाल व परिसर पिंजून काढला.मात्र कुरडकर आढळून आला नाही. त्याचा धारणी पोलिस कसून शोध घेत आहे. कुरडकरचे कुटूंब कांडली परिसरात असल्याची माहिती आहे.

इतरही मुलींच्या चौकशीची मागणी
आई-वडिलांपासून दूर राहणाऱ्या मुली आश्रमशाळेत निवासी असल्याने शिक्षकांचा त्यांच्यावर प्रचंड दबाव असतो. त्यातच काही नराधम शिक्षक अश्लील चाळे करीत असल्याने दबावापोटी त्या मुली कोणाला सांगत नाहीत. चिखली आश्रमशाळेतील इतरही काही मुलींना त्याने त्रास दिल्याची चर्चा असून त्याच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे. रविवारी संपूर्ण प्रकरण उघडकीस आणणारे चिखलीचे सामाजिक कार्यकर्ता देविदास कोगे यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
गावकऱ्यांच्या समयसूचकतेने अनर्थ टळला
रविवारी हरिसाल येथील प्राथमिक आरोग्य केंद्र बंद असतांना दोन विद्यार्थिनींना मुख्याध्यापक कुरळकर हा महिला अधीक्षकांची कुठलीच परवानगी न घेता घेऊन गेला एकीला हॉटेलात वीस रुपये देऊन बसवून ठेवले. दुसरीला खाजगी दवाखान्यात नेण्याची बतावणी करत थेट भाड्याच्या खोलीत घेऊन गेला. हा संपूर्ण प्रकार चौकात उपस्थित नागरिकांच्या तत्काळ लक्षात आल्याने त्यांनी समयसूचकतेचा परिचय देत कुरळकरचे घर गाठले. मात्र त्याने घराबाहेर पळ काढला.

आरोपी मुख्याध्यापक किरण कुरडकरविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तो पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू आहे
विलास कुलकर्णी,
ठाणेदार धारणी

चिखली येथील प्रकार माहित होताच सदर विद्यार्थिनीला घेऊन पोलिसात फिर्याद देण्याचे आदेश महिला अधीक्षकांना तात्काळ दिले. आमच्याकडून कारवाई केली जाईल.
- राहुल कर्डिले
प्रकल्प अधिकारी, धारणी

Web Title: Chikhli's headmaster, Pasar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.