बालरक्षक घेणार आता शाळाबाह्य मुलांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:10 PM2018-05-16T22:10:23+5:302018-05-16T22:10:23+5:30

कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही शाळाबाह्य मुलांची नोंद होते. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनातर्फे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

Child carers will now seek out-of-school children | बालरक्षक घेणार आता शाळाबाह्य मुलांचा शोध

बालरक्षक घेणार आता शाळाबाह्य मुलांचा शोध

googlenewsNext
ठळक मुद्देशाळेतील शिक्षकांचा सहभाग : शालेय शिक्षण विभागाचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरीही शाळाबाह्य मुलांची नोंद होते. अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी राज्य शासनातर्फे पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत राज्यात एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही, या दिशेने राज्य शासन कार्य करीत आहे. स्थलांतरित बालकांना शिक्षण देण्यासाठी तसेच शाळाबाह्य मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. सन २०१६ मध्ये संपूर्ण राज्यात एकाच दिवशी अशा मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यावेळी काही मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे आढळून आली. शासननिर्णयानुसार शाळाबाह्य मुलांना शाळेत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यास प्राधान्यक्रम देऊन बालरक्षक संकल्पना पुढे आली.
प्रत्येक शाळेच्या ठिकाणी एका शिक्षकाची बालरक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे तसेच प्रत्येक शहर साधन केंद्रात पाच शिक्षकांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या दीड हजारांवर प्राथमिक शाळा व अन्य सर्वच खासगी शाळांमधील शिक्षक ही भूमिका बजावणार आहेत. शासनाने नवीन वेबसाइट तयार केली असून, त्यावर पालक शाळांची माहिती द्यायची आहे. बालरक्षक होण्यासाठी शासनाने कुठलीही अट टाकलेली नाही. समाजाची कुठलीही व्यक्ती रक्षक म्हणून काम करता येणार आहेत. त्या व्यक्तीने शाळाबाह्य मुलांच्या शोध घेऊन त्याची माहिती एकत्र करायची आहे. त्यानुसार नजीकच्या शाळेत वर्गात प्रवेश दिला जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

Web Title: Child carers will now seek out-of-school children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.