ग्रामीण भागातील ‘बच्चे कंपनी’ हुश्शार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2016 11:59 PM2016-04-02T23:59:34+5:302016-04-02T23:59:34+5:30

पायाभूत चाचणीमध्ये माघारलेली बच्चे कंपनी शैक्षणिक प्रगती चाचणीत अव्वल ठरली आहेत.

'Child company' in rural areas! | ग्रामीण भागातील ‘बच्चे कंपनी’ हुश्शार!

ग्रामीण भागातील ‘बच्चे कंपनी’ हुश्शार!

Next

पायाभूतमध्ये माघारली : प्रगती चाचणीत अव्वल
प्रदीप भाकरे अमरावती
पायाभूत चाचणीमध्ये माघारलेली बच्चे कंपनी शैक्षणिक प्रगती चाचणीत अव्वल ठरली आहेत. इयत्ता दुसरी ते चवथीपर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांनी भाषा व गणित या उभय विषयांमध्ये सरासरी ७० टक्क्यांच्यावर गुण मिळविले आहे.
५ व ६ एप्रिलला होणाऱ्या संकलित - २ चाचणी परीक्षेपूर्वी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने दत्तक घेतलेल्या ४५९ शाळांमधून प्रगत शैक्षणिक चाचणी घेतली. ८ ते १० मार्च या कालावधीत घेतलेल्या या चाचणीला दुसरी ते चवथीचे सुमारे १८ हजार विद्यार्थी सामोरे गेले. भाषा (मराठी) व गणित या दोन विषयासंदर्भात ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे निष्कर्ष नुकतेच हाती आलेत. या निष्कर्षानुसार सप्टेंबर १५ मध्ये घेण्यात आलेल्या पायाभूत चाचणीच्या तुलनेत विद्यार्थ्यांची क्षमता वाढीस लागली आहे. क्षमतेवर आधारित प्राथमिक शिक्षणावर भर देतानाच शालेय शिक्षण विभागाने ‘ज्ञान रचनावाद’ स्वीकारला आहे. साहित्य निर्मिती करण्यात आली.

विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनाचे धडे
अमरावती : विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी त्याला स्वयंअध्ययनाचे धडे दिले जातात.
मराठी भाषा व गणितामध्ये मुले माघारल्याचे लक्षात येताच येथील डायटने दत्तक घेतलेल्या शाळांसह जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये ज्ञान रचनावादी अध्ययन पद्धतीचा वापर करून कृतीयुक्त उपक्रम राबविले. डायटच्या प्राचार्य हर्षलता बुराडे यांच्यासह ज्येष्ठ अधिव्याख्याता मिलिंद कुबडे, अधिव्याख्याते पवन मानकर व प्रवीण राठोड यांनी शाळांना भेटी देऊन शिक्षकांना प्रेरणा दिली. शैक्षणिक साहित्याचा वापर करून भाषा-गणित विषयाचा सराव करून घेतला. दत्तक शाळातील शिक्षकांचे प्रेरणा शिबिर घेतले. साधन व्यक्तींद्वारे शाळा, शिक्षकांना गुणवत्तेबाबत प्रोत्साहन दिले व त्यानंतर भाषा व गणित विषयांमध्ये प्रगत होण्याच्या दृष्टिकोनातून संकलित २ पूर्वी ४५९ शाळांमध्ये १८ हजार विद्यार्थ्यांचे प्रगत शैक्षणिक चाचणी घेतली. त्यात पायाभूतच्या तुलनेत विद्यार्थ्यांमध्ये भाषा व गणित या उभय विषयांची सांघिक क्षमता वाढून आल्याचे निरीक्षण डायटने नोंदविले आहे.

५ व ६ एप्रिलला संकलित - २ चाचणी
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत ५ व ६ एप्रिल २०१६ रोजी संकलित २ चाचणी राज्यात सर्वदूर होणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळा, जिल्हा परिषदा, नगरपालिका, खासगी शाळा, अनुदानित - विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित स्वयं अर्थसहाय्यित या सर्व शाळांना ही चाचणी लागू राहील. तसेच राज्याच्या हद्दीतील राज्य मंडळासह अन्य सर्व परीक्षा मंडळाच्या सर्व माध्यमांच्या संलग्न शाळांमध्ये ही चाचणी घेण्यात येणार आहे.

साधन व्यक्ती, अधिव्याख्याते, पर्यवेक्षक आदी सर्वांच्या सहाय्याने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्षमता वाढीवर भर देण्यात आला. प्रगत शैक्षणिक चाचणीचा उत्तम निकाल त्याचाच परिपाक होय. आता संकलित दोन चाचणी उत्तमरीत्या घेण्यावर भर आहे.
- हर्षलता बुराडे, प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था.

Web Title: 'Child company' in rural areas!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.