पोरका झालेल्या चिमुकल्याला चाईल्ड लाईनचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2019 01:21 AM2019-05-06T01:21:49+5:302019-05-06T01:22:20+5:30

रेल्वेच्या धडकेत आई व बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षीय बालक बचावला. सांभाळ करणारे वडीलही बे्रनट्युमरचे आजारी. अशा स्थितीत दोन वर्षीय चिमुकल्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने चाइल्ड लाइनची साथ चिमुकल्याला मिळाली आणि त्यांनी चिमुकल्याच्या निवाऱ्याची सुविधा केली.

Child line shelter for infant daughter Chimukkalea | पोरका झालेल्या चिमुकल्याला चाईल्ड लाईनचा निवारा

पोरका झालेल्या चिमुकल्याला चाईल्ड लाईनचा निवारा

Next
ठळक मुद्देरेल्वेखाली आई व बहिणीचा मृत्यू : दोन वर्षांच्या मुलगा आढळला उन्हातान्हात भटकताना

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : रेल्वेच्या धडकेत आई व बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर दोन वर्षीय बालक बचावला. सांभाळ करणारे वडीलही बे्रनट्युमरचे आजारी. अशा स्थितीत दोन वर्षीय चिमुकल्यावर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. सुदैवाने चाइल्ड लाइनची साथ चिमुकल्याला मिळाली आणि त्यांनी चिमुकल्याच्या निवाऱ्याची सुविधा केली. चांदूररेल्वे परिसरात उन्हातान्हात भटकणाºया त्या चिमुकल्याला ईशदया बालगृहात ठेवण्यात आले आहे.
चांदूर रेल्वे परिसरात दोन वर्षांचा मुलगा एकटाच उन्हात भटकत असल्याची माहिती एका व्यक्तीने चाइल्ड लाइनच्या १०९८ या हेल्पलाईन क्रमांकावर दिली होती. त्याच्यासोबत कोणीही नाही, त्यामुळे त्याला निवारा व पोषणाचे सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्या व्यक्तीने चाइल्ड लाइनकडे केली. या माहितीच्या आधारे हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील चाइल्ड लाइनच्या पदाधिकाऱ्यांनी त्या व्यक्तीशी संपर्क करून अधिक माहिती जाणून घेतली. त्यानंतर तत्काळ चाइल्ड लाइनच्या पदाधिकाºयांनी चांदूररेल्वे गाठून घटनास्थळी भेट दिली. त्यांनी मुलाच्या वडिलांची भेट घेऊन त्यांच्याकडून सर्व घटनाक्रम जाणून घेतला. त्यावेळी वडील दोन वर्षीय मुलाच्या पालन पोषणासाठी असमर्थ असल्याचे चाइल्ड लाइनच्या निदर्शनास आले. त्यामुळे चाइल्ड लाइनने बालकल्याण समितीशी संपर्क साधून मुलाची माहिती दिली. त्यानंतर चांदूर रेल्वे येथून चाईल्ड लाईन सदस्यांनी मुलाला व वडिलांना बालकल्याण समिती समक्ष हजर केले. बालकल्याण समितीने सदर प्रकरणाची शाहनिशा करून मुलाला निवारा देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या आदेशानुसार चाइल्ड लाइनच्या सदस्यांनी मुलाला तात्पुरता निवारा बालगृहात उपलब्ध करून दिला. सदर मुलाच्या भविष्यच्या दृष्टीने योग्य तो निर्णय बालकल्याण समिती घेईल. त्या बालकाच्या वडिलांच्या प्रकृतीत सुधारणा होईपर्यंत अमरावती येथील चाइल्ड लाइनचे सदस्य त्या मुलाची देखरेख करणार आहेत.

चाईल्ड लाईन बनली देवदूत
सदर प्रकरणामध्ये हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैध, माधुरी चेंडके, चाइल्ड लाइन संचालक डॉ.सूर्यकांत पाटील, प्रशांत घुलक्षे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. समन्वयक फाल्गून पालकर, समुपदेशक अमित कपूर, टीम मेंबर पंकज शिनगारे, मीरा राजगुरे, सरिता राऊत, अजय देशमुख, शंकर वाघमारे, सुरेंद्र मेश्राम व स्वयंसेवक चेतन वरठे यांनी प्रकरणाच्या पाठपुराव्यात सहकार्य केले. त्यामुळे त्या चिमुकल्यासाठी चाइल्ड लाइन देवदूत बनल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

काय घडले चिमुकल्यासोबत?
२६ फेब्रुवारी २०१९ रोजी पती-पत्नीत वाद झाला. पत्नी रागाच्या भरात मुलगी व मुलाला घेऊन घराबाहेर पडली. तिने रेल्वे स्टेशन गाठले. दोन मुलीसह आई रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेखाली रेल्वेखाली, तर मुलगा हातातून सुटून रुळाबाजूला पडला. मुलगी व आईचा जागीच मृत्यू झाला. त्या मुलाचा जीव वाचला, मात्र, त्याच्या जीवनातील पुढील प्रवास कठीण झाला. वडील मुलाचा सांभाळ करीत होते. मात्र, त्यांना ब्रेन ट्युमरचा आजार जडला होता. आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने वडील मुलाच्या संगोपनात असमर्थ ठरले आणि चिमुकल्यावर भटकतींची वेळ आली.

Web Title: Child line shelter for infant daughter Chimukkalea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.