१४ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:06 AM2021-05-04T04:06:24+5:302021-05-04T04:06:24+5:30
त्या मुलीचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील २१ वर्षीय व्यक्ती सोबत होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनला २ मे रोजी प्राप्त झाली. ...
त्या मुलीचा विवाह बुलडाणा जिल्ह्यातील २१ वर्षीय व्यक्ती सोबत होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनला २ मे रोजी प्राप्त झाली. सदर माहिती चाईल्ड लाईनचे केंद्रप्रमुख अमित कपूर यांनी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी अतुल भडांगे, जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले व बाल सरंक्षण अधिकारी भूषण कावरे यांना देण्यात आली. त्या माहितीच्या आधारावर चाईल्ड लाईनचे शंकर वाघमारे व बाल सरंक्षण कक्ष समुपदेशक आकाश बरवट व भूषण कावरे यांनी पथ्रोटचे सहायक पोलीस निरीक्षक जाधव यांच्याशी संपर्क साधून पोलिसांसोबत टवलार गाठले.
सदर गावात बालविवाह होत असलेल्या ठिकाणी भेट देण्यात आली. मुलीच्या आई वडिलांना घेऊन ग्राम बाल सरंक्षण समितीची बैठक घेण्यात आली. मुलीचे वय १८ वर्षे होईपर्यंत लग्न करणार नाही, असे हमीपत्र ग्राम बालसरंक्षण समिती व मुलीच्या आई वडिलांकडून भरून घेण्यात आले. मुलींच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने मुलीला १८ वर्षे होईपर्यंत मुलीचे संगोपन बालगृहात करता येईल, असे सांगण्यात आले. सदर कार्यवाही करीत असताना अंगणवाडी सेविका, सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, मुख्याध्यापक, तसेच गावातील सदस्य उपस्थित होते.