निमखेड बाजार येथे रोखला बालविवाह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:10 AM2021-06-05T04:10:15+5:302021-06-05T04:10:15+5:30
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार येथे १६ वर्षीय बलिकेचा बाल विवाह रोखण्यात आला. बालसंरक्षण कक्षाने आठवडाभरात हा ...
अमरावती : अंजनगाव सुर्जी तालुक्यातील निमखेड बाजार येथे १६ वर्षीय बलिकेचा बाल विवाह रोखण्यात आला. बालसंरक्षण कक्षाने आठवडाभरात हा तिसरा बालविवाह रोखल्याची माहिती आहे.
निमखेड बाजार येथे बालविवाह होण्याच्या काही तास अगोदर बाल सरंक्षण कक्षाला ही माहिती मिळाली.त्यानुसार महिला बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी जिल्हा बाल सरंक्षण अधिकारी अजय डबले व बाल सरंक्षण अधिकारी भुषण कावरे यांना कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी पी.बी.नांदने यांनी अंजनगाव सुर्जी पोलिस ठाण्याशी संपर्क करून सदर बलिकेची जन्मतारीख अंगणवाडी सेविका व जि. प.शाळेकडुन पळताळणी करण्यात आली. तेव्हा बालिका १६ वर्षाची असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निमखेड बाजारचे पोलीस पाटील दिनेश तनपुरे, ग्रामसेवक देशमुख, तलाठी रंजना गावंडे यांना सोबत घेऊन विवाहस्थळ गाठले. तेथे बालिकेच्या पालकांना तसेच वर पक्षाकडील लोकांना बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार मुलीचे वय १८ वर्षे व मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण होईपर्यंत लग्न न करण्याबाबत बंधपत्र लिहून घेण्यात आले. बालविवाहाबाबत समुपदेशन करण्यात आले. सदर कारवाईत बाल सरंक्षण कक्षाच्या विधी तथा परिविक्षा अधिकारी सीमा भाकरे, पोलिस स्टेशन अंजनगाव सुर्जी कर्मचारी विश्वनाथ राठोड,अंगणवाडी सेविका आदीचे सहकार्य लाभले.