लहान मुलांच्या अश्लील जाहिरातीवर आक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 11:14 PM2018-03-07T23:14:59+5:302018-03-07T23:14:59+5:30
लहान मुलांचा वापर करून अश्लील जाहिराती प्रकाशित करणे गुन्हा ठरते. एका मासिकात 'व्हॅलेटार्इंन डे' ग्रिटींग कार्ड कंपनीच्या जाहिरातीत लहान मुला-मुलीचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : लहान मुलांचा वापर करून अश्लील जाहिराती प्रकाशित करणे गुन्हा ठरते. एका मासिकात 'व्हॅलेटार्इंन डे' ग्रिटींग कार्ड कंपनीच्या जाहिरातीत लहान मुला-मुलीचे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले. त्या जाहिरातीसंदर्भात संबंधित व्यक्ती किंवा कंपनीविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी थिंक श्वाश्वतच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनाद्वारे केली.
बाल हक्क, न्याय व कायद्याविषयक माहिती देऊन या बाल लैंगिक शोषणाचा विरोधाला वाचा फोडण्याचे आवाहन पत्रपरिषदेत केले. शाश्वतच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी लहान मुलांचे छायाचित्रांचा जाहिरातीसाठी वापर केल्याबद्दल सामाजिक स्तरावर सर्वेक्षण केले. तो निष्कर्ष समाजासमोर मांडण्यासाठी पत्रकारांशी संवाद साधला. अशा जाहिरातीमुळे लहान मुले भरकटतात. विद्यार्थी अनावधानाने अश्लील गोष्टींकडे आकर्षित होतात आणि बळीसुद्धा पडतात, हा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा ठरतो, असे विद्यार्थ्यांनी कायद्याच्या अभ्यासातून दर्शविले. पत्रपरिषदेला शाश्वतचे आदित्य नागपुरे, अद्वैत रोडे, भूमि जैन, प्रणव तोंड्रे, पृथा धर्माळे, तन्मय पाटणकर, श्रेनीक साकला, ऋत्विजय धरमे, सलोनी करवा, रणवीर देशमुख, उन्नती राठी, वरुण बजाज, वत्सल कारीया यांची उपस्थिती होती.