रक्षाबंधनाच्या धाकाने वर्गातून पळाली मुले

By admin | Published: September 1, 2015 11:57 PM2015-09-01T23:57:34+5:302015-09-01T23:57:34+5:30

भाऊ-बहिणीचे नाते जपणारे रक्षाबंधन जेथे जबरदस्तीने लादले जाते, तेथे ते संबंधितांची फजिती करते

Children escaped from school by rickshaw pull | रक्षाबंधनाच्या धाकाने वर्गातून पळाली मुले

रक्षाबंधनाच्या धाकाने वर्गातून पळाली मुले

Next

सुदेश मोरेअंजनगाव सुर्जी
भाऊ-बहिणीचे नाते जपणारे रक्षाबंधन जेथे जबरदस्तीने लादले जाते, तेथे ते संबंधितांची फजिती करते. याचा प्रत्यय एका कनिष्ठ महाविद्यालयातील रक्षाबंधन कार्यक्रमात आला. एकाच वर्गातील मुलांना त्या वर्गातील मुलांनी राख्या बांधण्याचा प्रयोग प्राथमिक शाळांमध्ये ठीक आहे. पण, इंटरनेटच्या युगात हा प्रयोग महाविद्यालयीन तरुण मुलामुलींमध्ये राबविण्याचे भलतेच धाडस एका शाळा संचालकांनी केले.
अर्थात त्यामागचा उद्देश शाळेतील वातावरण सुसंस्कृत ठेवण्याचे असले, तरी ही कल्पना विद्यार्थ्यांना पचनी पडली नाही. त्यांनी त्यावर अनुपस्थितीचा सोपा उपाय शोधून काढला. कार्यक्रमाच्या दिवशी अकरावीतील मुले गायब झालेली पाहून उरलेल्या दोन मुलांना बारावीत पाठविण्यात आले.
मुलांच्या रांगा लावण्यात आल्या आणि रक्षाबंधन सुरू झाले. मुुलींनी वाटीत कुंकू घेऊन मुलांना टिक्के लावले. राख्या बांधल्या. काही मुलांनी राख्या बांधणाऱ्या मुलींना पेन भेट दिले. काहींनी पैसे दिले तर काहींनी मोठे चॉकलेट दिले.
कार्यक्रमात आरडाओरड व गोंधळ आवरण्यासाठी शिक्षक-शिक्षिकांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांना दरडावले व आजच्या दिवशी तरी मुलींना मान द्या, असे आवाहन केले. हे ऐकून बारावीच्या मुलांनी आपल्या मानापुढे केल्या. व मान घ्या मान असा इरसाल अभिनय केला. एका मुुलीने तिन मुुलांना राखी बांधल्यावरही तिला कोणतीच भेट मिळाली नाही. त्याचा राग तिने शाळेतून परतताना मुलांकडे जळजळीत नजरेने पाहून व ठेवणीतल्या शिव्यांतून व्यक्त केला.
शाळेच्या मैदानातला कार्यक्रम संपल्यानंतर इयत्ता अकरावीतील दोन मुले वर्गात आली आणि मुलींच्या तावडीत सापडली.
बहुसंख्य मुलींनी अल्पसंख्य मुलांना हातभर राख्या बांधून त्यांचा जीव मेटाकुटीस आणला. शेवटी आपल्यास अनुपस्थित बांधवांचे अनुकरण करुन तेही वर्गाबाहेर पळून गेले.
अशा प्रकारे मुुलामुलींनी ज्युनिअर कॉलेजमध्ये रक्षाबंधन धमाल एन्जॉय केला.

अंजनगावातील प्रकार, कल्पना पचनी पडली नाही
जे सापडले त्यांना बांधल्या हातभर राख्या
वर्गातील विद्यार्थिनी आपल्याला राखी बांधणार याची माहिती विद्यार्थ्यांना कळताच त्यांनी वर्गखोलीतून काढता पाय घेतला. ज्या विद्यार्थ्यांना रक्षाबंधन कार्यक्रमाची माहिती नव्हती, असे बोटावर मोजण्याऐवढेच विद्यार्थी वर्गखोलीत असल्याने विद्यार्थिनींनी त्यांना राख्या बांधल्या. यामध्ये इयत्ता अकरावीतील दोन मुलांचा समावेश होता.

Web Title: Children escaped from school by rickshaw pull

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.