कोरोनाकाळात लहान मुले झालीत ‘मोटू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:21+5:302021-07-05T04:09:21+5:30

जंक फूडकडे ओढा, मोबाईलवरच व्यस्त, मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम अमरावती : कोरोनामुळे दीड वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुले ...

Children grow up to be 'fat' during Corona | कोरोनाकाळात लहान मुले झालीत ‘मोटू’

कोरोनाकाळात लहान मुले झालीत ‘मोटू’

Next

जंक फूडकडे ओढा, मोबाईलवरच व्यस्त, मैदानी खेळांकडे दुर्लक्ष झाल्याचा परिणाम

अमरावती : कोरोनामुळे दीड वर्षभरापासून शाळा बंद आहेत. मुले घरीच असल्याने जंक फूडचे अतिसेवन, टीव्हीसमोर बसून जेवण, मैदानी खेळांऐवजी मोबाईल आणि कम्प्यूटर गेम्स खेळण्याकडे असणारा मुलांचा कल आणि बदललेली जीवनशैलीमुळे कोरोनाकाळात मुलांना लठ्ठपणाने ग्रासल्याचे बालरोेगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गतवर्षी मार्चपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. त्यामुळे गत १४ महिन्यांपासून शाळा-महाविद्यालये बंद आहे. ऑनलाईन शिक्षणाचे धडे मुले घरीच गिरवत आहेत. त्यामुळे मैदानी खेळांकडे दुर्लक्ष होत आहे. लॅपटॉप, कम्प्यूटरवर विविध गेम खेळण्यात मुले मग्न झाली आहेत. जेवणदेखील टीव्हीसमोर बसूनच करतात. त्यातील कार्टून फिल्म्स, संगीत, भीतिदायक प्रसंगामुळे किती जेवण घेतो, याचेही भान राहत नाही. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त अन्न पोटात जाते. परिणामी लहान मुलांच्या पोटाच्या तक्रारी वाढत आहे.

टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने मेटॅबॉलिक प्रक्रिया हळूहळू होते. त्यामुळे कमरेभोवती अनावश्यक चरबी निर्माण होते. लहान मुलांमध्ये ही समस्या अधिक जाणवत आहे. जेवण करताना टीव्ही पाहिल्याने पचनक्रिया बिघडते. दुसरीकडे कोरोनाकाळात मैदानी खेळाकडे मुलांचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे मुलांना लठ्ठपणासोबत अन्य आजाराने ग्रासले आहे. तसे निरीक्षणही डॉक्टरांनी नोंदविले आहे.

------------------

वजन वाढले कारण...

१) मुले टीव्हीसमोर बसून जेवण करतात. यात त्यांना आपण किती खातो, याचे भान राहत नाही

२) मैदानी खेळाकडे सतत दुर्लक्ष, सातत्याने मोबाईल, कम्प्यूटरवर गेम खेळत राहणे

३) जंक फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, बदललेली जीवनशैली

४) टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने मेटॅबॉलिक प्रक्रिया हळूहळू होते. यामुळे कमरेभोवती अनावश्यक चरबी निर्माण होते.

-------------

सातत्याने मोबाईल गेम खेळणे

मैदानी खेळाकडे दुर्लक्ष

टीव्हीसमोर बसून जेवण करणे

--------------

मुले टीव्ही, मोबाईल सोडतच नाही

कोरोनात ऑनलाईन शिक्षणामुळे मुले सतत मोबाईलवर असतात. दरम्यान गेम खेळणे, सतत हातात मोबाईल ठेवतात, शिवाय टीव्हीसमाेर बसून जेवण करतात आणि तासनतास एकाच जागी बसून राहतात. अतिशय खाणे हा देखील लठ्ठपणासाठी महत्वाचे कारण ठरले आहे. टीव्ही, मोबाईलमुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. डोळे आणि डोके दुखणे ही नवी समस्या उद्‌भवली आहे.

- रंजना मोरे, अमरावती.

---------

मुले जवण करताना प्रचंड त्रास देतात. टीव्हीसमाेर बसल्याशिवाय जेवण करीत नाहीत. टीव्ही अथवा मोबाईल असल्याशिवाय तोंडात घास घेत नाहीत. त्यामुळे मुलांचे जेवण आणि वजनही वाढले आहे. कोरोनाकाळात मुले मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण घेत असल्याने सतत गेम्स खेळतात. परिणामी खेळण्या-बागळण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. व्यायामाचा अभाव असल्याने लठ्ठपणाची समस्या वाढली आहे.

- प्रगती बांबोडे, अमरावती.

-----------

वजन कमी करण्यासाठी ही घ्या काळजी

- टीव्हीसमोर बसून जेवणे टाळा.

- जंक फूडचे अतिसेवन टाळा.

-नियमित अर्धा, पाऊण तास व्यायाम करा.

- स्निग्ध पदार्थाचे अतिसेवन टाळा.

- नियमित सकस आहार घ्या.

- मैदाने खेळण्याकडे लक्ष द्या.

----------------

लहान मुलांचे डॉक्टर काय म्हणतात...

मुले जेवत नसल्याने पालक त्यांना टीव्हीसमोर बसून जेवायला देतात. यात मुलांचे जेवणाकडे कमी, तर टीव्ही, मोबाईलच्या स्क्रीनकडे अधिक लक्ष राहते. त्यामुळे मुले अधिक खातात. यात त्यांच्या पचनक्रियेवर विपरित परिणाम होतो. मेटॅबॉलिक प्रक्रिया हळूहळू होते. यामुळे त्यांच्या कमरेभोवती अनावश्यक चरबी वाढून लठ्ठपणाची समस्या निर्माण होते. जंक फूड सेवनाने लठ्ठपणाचे आजारही जडतात.

- हेमंत मुरके, बालरोगतज्ज्ञ, अमरावती.

---------

टीव्हीसमोर बसून जेवण केल्याने याचा आरोग्यावर परिणाम जाणवत असल्याचे समोर आढळून आले आहे. टीव्हीसमोर बसून जेवण करीत असल्याने टीव्हीवर नेमके काय सुरू आहे, याकडे लक्ष असते. त्यामुळे क्षमतेपेक्षा अधिक अन्न पोटात जाते आणि त्याचे गंभीर परिणाम आरोग्यावर होतात. दुसरी बाब म्हणजे, मुले मोबाईलवर खेळत असल्याने मैदानी खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. यातूनही लठ्ठपणा बळावला आहे.

- नीलेश मोरे, बालरोगतज्ज्ञ, अमरावती.

Web Title: Children grow up to be 'fat' during Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.