गरिबाची मुलंही बनणार ‘स्मार्ट’; अमरावतीच्या ६० शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम

By जितेंद्र दखने | Published: April 2, 2024 09:01 PM2024-04-02T21:01:14+5:302024-04-02T21:01:37+5:30

समग्र शिक्षा अभियान : विविध साहीत्याचा पुरवठा

Children of the poor will also become 'smart'; Smart classrooms in 60 schools | गरिबाची मुलंही बनणार ‘स्मार्ट’; अमरावतीच्या ६० शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम

गरिबाची मुलंही बनणार ‘स्मार्ट’; अमरावतीच्या ६० शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम

अमरावती : समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील ६० शाळांमध्ये केंद्राच्या माध्यमातून ‘स्मार्ट क्लासरूम’ची निर्मिती केली जाणार आहे. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूमसाठी आवश्यक साहित्यही पोहोचते झाले आहे. त्यामुळे लवकरच या शाळांमधील वर्गही ‘स्मार्ट क्लासरूम’ म्हणून उदयास येणार आहेत. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत ग्रामीण भागामध्ये १,५८५ वर शाळा असून, येथे जवळपास दोन लाखांवर विद्यार्थी शिक्षण घेतात.

स्मार्ट क्लासरूममध्ये शासनाकडून निश्चित केलेल्या एका खासगी कंपनी या संस्थेकडून इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल ६५ इंच, ओपीएस टॅबलेट कॅमेरा, ट्रॉली स्पीकर, ट्रॉली स्टॅण्ड ६५ इंच आयएफपीडी, एलएमएस हे साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.केंद्र शासनाच्या नव्या शैक्षणिक धोरणाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल होत आहेत. कॉर्पोरेट शाळांच्या तुलनेत या शाळा मागे राहू नयेत, यासाठी जिल्ह्यातील ६० शाळा स्मार्ट बनविण्याचा निर्णय झाला आहे. राज्यस्तरावरून या शाळांना लागणारे सर्व साहित्य उपलब्ध होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील दर्जा हा सुमार आहे. त्यामुळे दिवसेंदिवस ही पटसंख्या घटत आहे. आता समग्र शिक्षाअंतर्गत जिल्ह्यात ६० शाळांमध्ये केंद्राच्या माध्यमातून स्मार्ट क्लासरूमच्या निर्मिती केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या टिकून राहण्यासोबतच येथे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे, यासाठी मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय पोषण आहार, प्रवास भत्ता आदी योजना राबविल्या जातात.

Web Title: Children of the poor will also become 'smart'; Smart classrooms in 60 schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.