चायना मांजाला विक्रेत्यांचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:12 AM2021-01-14T04:12:00+5:302021-01-14T04:12:00+5:30

अमरावती : नायलॉन अर्थात चायना मांजाची क्रेझ कोरोनाच्या लॉकडाऊनपूर्वी होती. मात्र, आता कायद्याच्या बडग्यामुळे विक्रेतेदेखील ‘चायना मांजा मिळणार नाही’ ...

China cat vendors refuse | चायना मांजाला विक्रेत्यांचा नकार

चायना मांजाला विक्रेत्यांचा नकार

Next

अमरावती : नायलॉन अर्थात चायना मांजाची क्रेझ कोरोनाच्या लॉकडाऊनपूर्वी होती. मात्र, आता कायद्याच्या बडग्यामुळे विक्रेतेदेखील ‘चायना मांजा मिळणार नाही’ असे ग्राहकांना स्पष्ट करतात. सुरेश पतंगवाला या पतंग व अन्य साहित्य विक्रीच्या बऱ्यापैकी बड्या दुकानांत हा प्रसंग निदर्शनास आला. संक्रांतीच्या पर्वावर पतंग उडविण्यासाठी अमरावतीकर सरसावले आहेत. त्यासोबतच मांजा मजबूत करण्यासाठी काच, चिक्की हे पारंपरिक साहित्य पुन्हा बाहेर आले आहेत.लॉकडाऊनच्या काळात घरात बसून ठेवण्यात आलेल्या अमरावतीकरांनी खूप पतंगबाजी केली. त्यावेळी चायना मांजा हमखास विकला जात होता. पक्षी गुंतणे, पंख कापले जाणे एवढेच नव्हे तर चालत्या माणसाच्या गळ्याभोवती आवळल्यास काप पडणे, तारांवरून हा मांजा काढताना घर्षणाने विजेसंबंधी अपघात अशा अनेक घटना पुढे आल्या होत्या. त्यामुळेच की काय, पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात शहर कोतवाली पोलिसांनी पतंगविक्री हाच उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या जावेद मील पतंगवाले या प्रतिष्ठानावर धाड टाकून चायना मांजा जप्त केला. ही कारवाई ३६ हजारांची दाखविली गेली. तथापि, त्याचा परिणाम शहरातील पतंगबाजीवर झाला. अलीकडच्या दिवसांपर्यंत शहराच्या आसमंतात पतंग दिसत नव्हती.

‘लोकमत’ चमूने शहरातील काही पतंग विक्रेत्यांकडे रविवार व सोमवारी विचारणा केली असता, सुत्तल ते पॉलिस्टर धाग्याचे विविध प्रकार १० ते ४० रुपये बंडलच्या दरात दाखविण्यात आले. मात्र, चायना मांजा मिळणार नाही, याबाबत ते ठाम होते.

दरम्यान, महापालिकेनेही मकरसंक्रांतीच्या पर्वावर चायना मांजाबाबत परिपत्रक जारी केले. झोननिहाय पथके तयार करून पाच हजारांच्या दंडाची घोषणा केली आहे.

कोट

चायना मांजा विक्री कायद्याच्या बडग्याने बंद आहे. बच्चे कंपनी नायलॉन मांज्याची मागणी करतात. मात्र, पतंग उडविण्यासाठी पारंपारीक मांजा, धागा वापरा, असे सांगितले जाते.

-अनिल मतलानी, पतंग विक्रेते

Web Title: China cat vendors refuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.