चिनी बनावटीच्या राखीला यंदा करा ‘बाय-बाय’

By admin | Published: July 17, 2017 12:12 AM2017-07-17T00:12:46+5:302017-07-17T00:12:46+5:30

बहीण भावाच्या पवित्र बंधनाच्या धाग्याला देशसेवेचा अधिक स्पर्श रहावा म्हणून यंदा चिनी बनावटी राखीला बाय-बाय करण्यात येणार आहे.

Chinese-made Rakhi is done by 'buy-by' | चिनी बनावटीच्या राखीला यंदा करा ‘बाय-बाय’

चिनी बनावटीच्या राखीला यंदा करा ‘बाय-बाय’

Next

आम्ही भारतीयांचा पुढाकार : व्यापारी बांधवांना विनंतीपत्र, राखीची विक्री न करण्याचे आवाहन
मोहन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : बहीण भावाच्या पवित्र बंधनाच्या धाग्याला देशसेवेचा अधिक स्पर्श रहावा म्हणून यंदा चिनी बनावटी राखीला बाय-बाय करण्यात येणार आहे. आम्ही भारतीय संघटनेने पुढाकार घेऊन व्यापारी बांधवांनी या राख्या आपल्या दुकानात विक्रीसाठी ठेवू नये म्हणून विनंतीपत्र देणार आहे़
दिवसेंदिवस चीनच्या कुरापती वाढल्या आहेत़ सिक्कीममध्ये बेकयदेशीर घुसखोरी करू पाहत आहे़ भारतीय सेना सडेतोडपणे चीनला उत्तर देण्यास सज्ज असले तरी आपण भारतीय म्हणून सैनिक व देशाच्या पाठीशी उभे राहणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे़ हीच भावना समोर ठेवून चीनला धूळ चारण्यासाठी कोणतीही चायनीस वस्तू खरेदी न करण्याचा निर्धार धामणगाव तालुक्यात दोन वर्षांपासून सामाजिक व देशसेवेचे कार्य करणाऱ्या आम्ही भारतीय संघटनेचे कार्यकर्ते करीत आहे़
आगामी काळात २० दिवसांनंतर येणाऱ्या रक्षाबंधनाला चीन बनावटीची राखी तालुकावासीयांनी खरेदी करू नये. हा बहीण-भावाच्या स्रेहाचा पवित्र उत्सव देशी धागा बांधून अधिक चांगल्या पद्धतीने साजरा करावा तसेच व्यापारी बांधवांनी अशा चीन बनावटीच्या राख्या आपल्या दुकानात विक्री करीता न आणता देश सेवेला अधिक हातभार लावावा, असे विनंतीपत्र प्रत्येक राखी विक्रेत्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आम्ही भारतीय संघटनेचे तालुकाध्यक्ष अनिल सोनटक्के यांनी दिली़

चायनिज राखीपासून आरोग्याला धोका
चिनी बनावटीची राखी दिसायला सुंदर व आकर्षक दिसते़ परंतु चिनमधून आलेला कच्चा माल व त्यावर रासायनिक प्रक्रिीया झाल्यानंतर सूत, धागे, कागद व पॉलिथीनचा वापर राखीसाठी केला जातो़ ही राखी लहान मुलांच्या आरोग्यासाठी अधिक धोकादायक असते़़ जीव मळमळ करणे, ओकारी होणे, ताप येणे आदी विविध आजार गतवर्षी लहान मुलांना राखी बांधल्यानंतर झाले होते. त्यांची बोटे तोंडात गेल्यामुळे असले आजार झाले होते. त्यामुळे ही चायनिज बनावट राखी आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे़

येत्या रक्षाबंधन सणाला देश माझा, मी देशाचा, हे भान ठेवून प्रत्येक भारतीयांनी चिनी बनावटीच्या राखीची खरेदी करू नये, व्यापारी बांधवांनी अशा राख्या दुकानात विक्रीसाठी ठेवू नये.
- वैभव बावणकुळे,
प्रदेशाध्यक्ष, आम्ही भारतीय संघटना

Web Title: Chinese-made Rakhi is done by 'buy-by'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.