तिन्ही शिशू चिरनिद्रिस्त

By admin | Published: May 31, 2017 12:21 AM2017-05-31T00:21:39+5:302017-05-31T00:21:39+5:30

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पीडीएमसीत उपचार घेताना दगावलेल्या तिन्ही मृत शिशुंवर ३६ तासांच्या प्रदीर्घ गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Chinnadiyast three boys | तिन्ही शिशू चिरनिद्रिस्त

तिन्ही शिशू चिरनिद्रिस्त

Next

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार : अखेर ३६ तासांनी थांबली फरफट
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे पीडीएमसीत उपचार घेताना दगावलेल्या तिन्ही मृत शिशुंवर ३६ तासांच्या प्रदीर्घ गोंधळानंतर मंगळवारी सायंकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पालकांच्या भावना अनावर झाल्या होत्या.
रविवारी मध्यरात्री शिशुंचा अकस्मात मृत्यू झाल्यानंतर पालकांचा रोष उफाळून आला. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. तणावजन्य स्थिती पाहता सोमवारी पहाटेच तिन्ही शिशुंचे शव इर्विनच्या शवविच्छेदनगृहात नेण्यात आले. मात्र, अकोल्यातील डॉक्टरांची चमू उशिरा रात्री पर्यंत न पोहोचल्याने पालकांसह नातलग ताटकळले होते. अखेरीस रात्री ८.३० वाजता डॉक्टरांची चमू पोहोचली आणि शवविच्छेदन सुरू झाले. ही प्रक्रिया मध्यरात्रीपर्यंत सुरू होती. त्यामुळे पालकांना त्यांच्या चिमुकल्यांचे शव हस्तांतरीत होऊ शकले नाहीत. अखेरीस मंगळवारी सकाळी मृत शिशुंचे नातलग मृतदेह घेण्यास इर्विनच्या पोस्टमार्टम हाऊससमोर गोळा झाले. आमदार राणादेखील तेथे पोहोचले. त्यांनी गोरगरीब पालकांच्या वेदना पाहून त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचून त्यांच्याशी चर्चा केली. यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवण्याचे आश्वासन विभागीय आयुक्तांनी दिलेत.
यानंतर दुपारी ४ वाजताच्या सुमारास आशिष घरडे, दिनेश विरूळकर, बंटी कावरे यांनी मुलांचे पार्थिव सोपविण्यात आले. पार्थिव घेऊन तिघेही आपापल्या घरी पोहोचलेत. तेथेही चिमुकल्यांच्या मातांचा हृदय हेलावणारा आकांत सुरू होता. पुरते जगही न पाहिलेल्या आपल्या बाळांना शेवटचे पाहून त्यांना हृदयाशी कवटाळून त्यांना मातांसह नातलगांनी अंतिम निरोप दिला. बंटी कावरे यांच्या शिशूवर शंकरनगरातील स्मशानभूमित तर आशिष घरडे यांच्या बाळाचा सीआरपीएफ कॅम्प परिसरातील आणि दिनेश विरूळकर यांच्या बाळाचा फ्रेजरपुऱ्याच्या स्मशानभूमीत दफनविधी करण्यात आला.

मातेची प्रकृती बिघडली
पोटच्या गोळ्याचे कलेवर पाहून शिल्पा विरूळकर नामक मातेची प्रकृती अचानक बिघडली. शवविच्छेदनानंतर बाळाला घरी आणताच त्या भोवळ येऊन बेशुद्ध झाल्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता त्यांना खासगी इस्पितळात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

Web Title: Chinnadiyast three boys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.