चिरोडी जिल्हा परिषद शाळेत लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:51+5:302021-05-31T04:10:51+5:30
पोहराबंदी : ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाल्याने आता ग्रामीणमधील छोट्या-मोठ्या खेड्यांत लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळणे सुरू ...
पोहराबंदी : ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ झाल्याने आता ग्रामीणमधील छोट्या-मोठ्या खेड्यांत लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळणे सुरू झाले आहे.
मांजरखेळकसबा उपकेंद्रअंतर्गत येणाऱ्या चिरोडी गावातील जिल्हा परिषद शाळेत कोविड लसीकरण मोहिमेत ४५ वयोगटातील ८३ नागरिकांना लस देण्यात आली. ही मोहीम शनिवारी सकाळी दहा ते एक या वेळेत सोशल डिस्टन्स, माक्स, सॅनिटायझर याचा वापर करून गर्दी न करता लसीकरणाचा पहिला डोस पार पडला. या मोहिमेस गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
यावेळी सी. एच. ओ. श्वेता इंगोले, आरोग्य सहायक इटके, आरोग्य सेविका पद्मा जाधव, आरोग्य सेवक देवेंद्र मोरे, आरोग्य सेविका माधवी, अंगणवाडी सेविका जाधव, शेंडे, आशा सेविका, मरस्कोल्हे, चिरोडी गावातील सरपंच माला चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीसपाटील, ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.