मेळघाटात चारोळी, मोहफुलांचे वाळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 01:08 AM2019-05-05T01:08:56+5:302019-05-05T01:09:14+5:30

उन्हाळा लागताच जिल्हाभरात महिलांना कुरड्या, पापड, शेवळ्या आदी पदार्थ साठविण्याचे वेध लागतात, तर मेळघाटात आबालवृद्ध जवळपास दोन महिने जंगलातील मोहफुले, हिरडा, चारोळी आदी रानमेवा वेचून, तोडून, वाळवून रोजगारनिर्मिती करीत असतात.

Chololi in Melghat, dusky gourd | मेळघाटात चारोळी, मोहफुलांचे वाळवण

मेळघाटात चारोळी, मोहफुलांचे वाळवण

googlenewsNext
ठळक मुद्देरानमेवा। वृक्षतोडीमुळे येणार संपुष्टात

नरेंद्र जावरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखलदरा : उन्हाळा लागताच जिल्हाभरात महिलांना कुरड्या, पापड, शेवळ्या आदी पदार्थ साठविण्याचे वेध लागतात, तर मेळघाटात आबालवृद्ध जवळपास दोन महिने जंगलातील मोहफुले, हिरडा, चारोळी आदी रानमेवा वेचून, तोडून, वाळवून रोजगारनिर्मिती करीत असतात.
धारणी, चिखलदरा तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोहाची झाडे आहेत. त्याचप्रमाणे काही ठिकाणी चारोळी, हिरडा, बेहडा, जांभूळ, आवळा आदी विविध फळझाडे आहेत. शासनाकडून अपेक्षित दर मिळत नसल्याने आदिवासींना खासगी व्यापाऱ्यांकडे मिळेल त्या दरात त्यांची विक्री करावी लागत असल्याचे वास्तव आहे. शासनाच्या आदिवासी विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, ग्रामसभा, आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीमार्फत मोहफुले सोडून इतर वनउपज खरेदी होते; मात्र अल्प दर व अनियमित खरेदीमुळे खासगी व्यापारी नफा मिळवित असल्याचे चित्र आहे.
वृक्षतोडीमुळे उत्पन्नात घट
मेळघाटातील आदिवासी शेतातील किंवा जंगलात मोहाची झाडे तोडत नाही. त्रिफळा चूर्ण व आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी महत्त्वपूर्ण समजल्या जाणाºया हिरडा, बेहडा आदी झाडांची कत्तल झाल्याने या वृक्षांची संख्या कमी झाली आहे. चारोळीची झाडेसुद्धा अल्प राहिली आहेत. भविष्यात हे वृक्ष नष्ट झाल्यास त्याचा आर्थिक फटका आदिवासींनाच बसणार आहे.
कल्पवृक्ष मोह
मोहाची गावरान दारू काढली जाते, हे सर्वच जाणतात. मात्र, मोहफुले विविध व्यंजनात वापरली जातात. त्यांच्या बियांपासून तेल निर्मिती होते. हे तेल आदिवासी जेवणात वापरतात, तर ढेप आयुर्वेदिक औषधी कंपन्या खरेदी करतात.

रात्रीला वेचतात मोहफुले मेळघाटातील आदिवासी रात्री जागून किंवा पहाटे ४ पासून मोहफुले गोळा करण्यासाठी घरातील सर्व सदस्यांसह जातात. वाळविलेल्या मोहफुलांचा दर प्रतिकिलो ३० रुपये, चारोळी टरफलासहित ४० रुपये, तर बालहिरड्याला सर्वाधिक ५० रुपये किलोचा दर व्यापाऱ्यांकडून दिला जातो. मेळघाटच्या साद्राबाडी, टिटंबा, बैरागड, हतरू, चुरणी, काटकुंभ, टेम्ब्रूसोंडा या पट्ट्यातील गावांमध्ये वनउपज आदिवासींना रोजगार देणारा ठरला आहे.

Web Title: Chololi in Melghat, dusky gourd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.