उन्हाळ्यात चुडामन वाहू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:14 AM2021-05-21T04:14:57+5:302021-05-21T04:14:57+5:30
फोटो पी २० चुडामणी वरुड: उन्हाळ्यात नदी वाहने हे दुर्लभच होते पण हे वास्तव आहे. दरवर्षी चुडामन नदीत एप्रिल ...
फोटो पी २० चुडामणी
वरुड: उन्हाळ्यात नदी वाहने हे दुर्लभच होते पण हे वास्तव आहे. दरवर्षी चुडामन नदीत एप्रिल महिन्यात धरणाचे पाणी सोडण्यात येते. यावर्षी विलंब झाल्यामुळे व पाणीटंचाईचा प्रश्न उपस्थित झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मागणी लाऊन धरली होती. अखेर पाणी नदीत सोडण्यात आले असून तूर्तास पाणीटंचाईचा दाह कमी होणार आहे.
उन्हाळ्यात नदी वाहतांनाचे विलोभनीय दृश्य नजरेत साठवून ठेवण्याजोगे आहे. चुडामन नदीच्या उगमस्थानजवळ नागठाना १ नागठाना २ प्रकल्प आहेत. या प्रकल्पाचे पाणी वर्षातून दोनदा सोडण्यात येते. यामुळे नदीकाठच्या वरुड, आमडापूर,राजुरा बाजार, वाडेगाव, काटी, गाडेगाव,वघाड या गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई व सिंचनाची सोय होते. या नदीवर बांधलेले बंधारे भरल्या जाते. यावर्षी पाणी सोडण्यास विलंब झल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी यांनी जिव्हाळ्याचा प्रश्न लावून धरला. अखेर नदीत पाणी सोडण्यात आले. * * * * * * *गेल्या दोन वर्षांपासून नदीत पाणी सोडण्यास टाळाटाळ होत आहे. हक्काचे पाणी सोडण्यासाठी जी प सदस्य राजेंद्र बहुरूपी व राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष बाळू पाटील यांनी प्रयत्न केले. * * * * * * *माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या दूरदृष्टीचे फलित. दोन दशकांपूर्वी * * * * * *माजी कृषिमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या दूरदृष्टीने सिंचन प्रकल्प पूर्णत्वास गेले. चुडामन नदीवर कोल्हापूरी बंधारे बांधून प्रकल्पाचे पाणी नदीत सोळल्या जाण्याची परंपरा त्यांच्याच काळातील. पण अलिकळच्या काळात पाणी सोडण्यास टाळाटाळ होत आहे.
झटामझीरी प्रकल्पातून केला विसर्ग
तालुक्यातील अनेक प्रकल्प एकमेकांना जोडल्या गेले. झटामझीरी प्रकल्पात जलसाठा बऱ्यापैकी असल्यामुळे हे पाणी चुडामन नदीत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु गावकऱ्यांनी विरोध केल्यामुळे पोलीस सहकार्य मागवण्यात आले.