नरबळी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

By admin | Published: August 24, 2016 12:02 AM2016-08-24T00:02:09+5:302016-08-24T00:02:09+5:30

पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमेश सगणे व अजय वणवे या विद्यार्थ्यांचा नरबळी देण्यासाठी त्यांच्यावर जीवेघणे हल्ले करण्यात आलेत.

CIR inquiry in case of murder | नरबळी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

नरबळी प्रकरणाची सीआयडी चौकशी करा

Next

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीची मागणी
अमरावती : पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रमशाळेतील विद्यार्थी प्रथमेश सगणे व अजय वणवे या विद्यार्थ्यांचा नरबळी देण्यासाठी त्यांच्यावर जीवेघणे हल्ले करण्यात आलेत. याप्रकरणाची आश्रमाची सीआयडी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तिवसा शाखेने केली आहे.
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात धामणगाव रेल्वे तालुक्यातील पिंपळखुटा येथील शंकर महाराज आश्रम ट्रस्टद्वारा संचालित वसतिगृहात शिकणारा इयत्ता पाचवीतील विद्यार्थी प्रथमेश सगणे याचा वसतिगृहातील कर्मचारी सुरेंद्र मराठे व त्याच्या साथीदाराने ब्लेडने गळा चिरून नरबळी देण्याचा प्रयत्न केला. प्रथमेश मृत्युशी झुंज देत आहे, तर अजय वणवे जखमी आहे. या विद्यार्थ्यांसोबत झालेले कृत्य अतिशय घृणास्पद आहे. या घटनेचा अंनिसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. विद्यार्थ्यांवर झालेले हल्ले आश्रम ट्रस्टच्या आवारात घडल्याने त्याला शंकर महाराज ट्रस्ट व त्यांचे आश्रम ट्रस्ट जबाबदार आहे. त्यामुळे या घटनेच्या अनुषंगाने केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत आश्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच प्रथमेश सगणे व अजय वणवे यांच्यावरील हल्ल्याची सीआयडी चौकशी व्हावी, या हल्ल्यातील आरोपींना कठोर शासन व्हावे, शंकर महाराज आश्रमातील ट्रस्टी, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, शंकर महाराज आश्रम ट्रस्टचे सर्व आर्थिक स्त्रोत, आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, शंकर महाराज आश्रम ट्रस्ट व शैक्षणिक संस्थांवर बंदी घालावी आदी मागण्या सादर निवेदनात करण्यात आल्या आहेत.
यावेळी अंनिसचे तालुका अध्यक्ष रवींद्र निंघोट, मोझरीचे शाखाध्यक्ष शफीक शहा, अंकुश वाघ, संतोष निमकर, अभिजित भेलकर, गणेश भुरे, योगेश पाटील, सुनील राऊत, योगेश लोणकर, अमित खारोडे, हेमराज बेलकर, सेवक भुरे, मनोज हटवार, दिलीप छापामोहन, ओमप्रकाश वाघमारे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: CIR inquiry in case of murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.