सिटिझन फीडबॅकवर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 10:49 PM2018-01-14T22:49:51+5:302018-01-14T22:50:33+5:30

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण देशभरातील ४०४१ शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ४००० गुणांच्या या परीक्षेची सर्वाधिक मदार नागरिकांच्या अभिप्रायावर अवलंबून आहे.

Citizen Feedback | सिटिझन फीडबॅकवर मदार

सिटिझन फीडबॅकवर मदार

Next
ठळक मुद्देसंकेतस्थळावर नोंदवा अभिप्राय : १९६९ टोल फ्री क्रमांक

आॅनलाईन लोकमत
अमरावती : नववर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून संपूर्ण देशभरातील ४०४१ शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ४००० गुणांच्या या परीक्षेची सर्वाधिक मदार नागरिकांच्या अभिप्रायावर अवलंबून आहे. नागरिकांच्या अभिप्राय व सूचनांसाठी १४०० गुण असून यात अमरावतीकरांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार, महापौर संजय नरवणे आणि स्थायी सभापती तुषार भारतीय यांनी केले आहे. ‘मिस्ड कॉल सिटिझन फीडबॅकमध्ये शहर शून्य ’या वृत्तातून ‘लोकमत'ने त्यावर प्रकाशझोत टाकला. त्यापार्श्वभूमिवर प्रशासन व पदाधिकाºयांकडून पुन्हा एकदा लोकसहभागाचे जोरकस आवाहन करण्यात आले आहे.
अमरावतीकर नागरिकांनी १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा, त्यानंतर मिस्ड कॉल देणाºया नागरिकांना स्वच्छ भारत मिशनकडून येणाºया कॉलवर सहा प्रश्न विचारण्यात येतील, त्या प्रश्नांची सकारात्मक उत्तरे द्यावीत, जेणेकरून अमरावती शहर स्वच्छ सर्वेक्षणाच्या गुणांकनात अव्वल येऊ शकेल. मिसकॉल दिल्यावर अवघ्या पाच ते सात मिनिटात ९११२०६२००४०० या क्रमांकावरून मोबाईलधारकांशी संपर्क साधण्यात येतो. १९६९ या टोल फ्री क्रमांकावर प्रतिक्रिया नोंदविण्यावर १०० गुण अवलंबून आहेत. १९६९ या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन नागरिकांना त्यांच्या प्रतिक्रिया द्यावयाच्या आहेत.
४ हजार गुणांच्या या परीक्षेत सेवास्तरावरील प्रगती व नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी प्रत्येकी १४०० व प्रत्यक्ष निरीक्षणाकरिता १२०० गुण आहेत. स्वच्छ सर्वेक्षणास सामोरे जात असताना शहराच्या गुणांकनाची मदार ‘सिटिझन फीडबॅकवर’ अवलंबून आहे. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान क्वालिटी कौन्सिल आॅफ इंडियाचे असेसर्स नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊन शहराचे गुणांकन ठरविणार आहेत.
संकेतस्थळावर लिंक उपलब्ध
शहरातील एकंदरीत स्वच्छतेबाबत अमरावतीकर नागरिक स्वच्छ डॉट सिटी आणि स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या संकेतस्थळावरसुद्धा अभिप्राय नोंदवू शकतात. या दोन्ही संकेतस्थळावर नागरिकांच्या प्रतिक्रियेसाठी स्वतंत्र लिंक देण्यात आली आहे. त्यावरही अमरावतीकरांनी अभिप्रय नोंदवून स्वच्छ सर्वेक्षणात शहराला उत्तम गुणांकन मिळविण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आयुक्त हेमंत पवार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Citizen Feedback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.