नागरिकांनो सावधान ! बेजबाबदारपणा टाळा ! कोरोना अजूनही जिवंत आहे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:18 AM2021-08-25T04:18:07+5:302021-08-25T04:18:07+5:30

वरुड :- जून महिन्यापर्यंत कोरोनाची मोठी यादी वरुड तालुक्यात होती परंतु प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोरोनावर मात केली . ...

Citizens beware! Avoid irresponsibility! Corona is still alive! | नागरिकांनो सावधान ! बेजबाबदारपणा टाळा ! कोरोना अजूनही जिवंत आहे !

नागरिकांनो सावधान ! बेजबाबदारपणा टाळा ! कोरोना अजूनही जिवंत आहे !

Next

वरुड :- जून महिन्यापर्यंत कोरोनाची मोठी यादी वरुड तालुक्यात होती परंतु प्रशासनाच्या दक्षतेमुळे कोरोनावर मात केली . मात्र नागरिकांचा स्वैराचार महाल आणि अनावश्यक गर्दी होऊन विना मास्क फिरणाऱयांची संख्या वाढली . यामुळे गेल्या आठ दिवसात पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले . दिवसाला दोन ,तीन रुग्नाच्या नोंदी होऊ लागल्या तर सोमवार २४ ला एका ३३ वर्षीय माहेलाचा डेल्टा प्लेस पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने आरोग्य प्रशासनात खळबळ माजली .यामुळं वरुड करणो पुन्हा सावधान ! कोरोना आपला पाठलाग करत आहे असे म्हणण्याची वेळ आली आहे .

राज्यात कोरोनाचा कहर माजला असून अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी वरुड तालुका हॉटस्पॉट बनला होता . हजारो कोरोना पॉझिटिव्ह रुग्नाची यादी झाली होती . परंतु प्रशासनाने यावर नियंत्रण मिळविण्या करिता शर्थीचे प्रयत्न करून कोरोना हद्दपार केल्यागत परिस्थिती निर्माण केली . मात्र गेल्या आठवड्या भरापासून तलौक्यासह शहरात दिवसागणिक दोन तीन कोरोना रुग्नाच्या नोंदी होत आहे तर हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही तर २४ ला सोमवारला वरुड शहरातील एका ३३ वर्षीय माहीलेचा कोरोनादुसरा स्टेन म्हणजे डेल्टाप्लस चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाची झोप उडविली आहे . एकीकडे डेंग्यू मलेरियाचा प्रादुर्भाव असताना डेल्टा प्लस रुग्ण आढळल्याने प्रशासनात खळबळ माजली आहे . याबाबत गोपनीय माहिती मिळाली असली तरी आरोग्य विभागाची भागदौड सुरु झाली असून तातडीच्या बैठका सुरु झाल्या हे विशेष .नागरिकांनो सावधान ! बेजबाबदारपणा टाळा , कोरोना अजूनही जिवंत आहे असे म्हण्याची वेळ वरुडकरांवर आली आहे .

Web Title: Citizens beware! Avoid irresponsibility! Corona is still alive!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.