शहरातील नागरिकांचा लसीकरणात उत्साह कमी, आतापर्यंत गाठले २२ टक्के उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:16 AM2021-06-16T04:16:09+5:302021-06-16T04:16:09+5:30

संसर्ग माघारल्याने नागरिक बिनधास्त, दुसऱ्या लाटेत केंद्रांवर लागायच्या पहाटे ४ पासून रांगा अमरावती : शहरातील कोरोना संसर्गाचा ग्राफ माघारल्याने ...

Citizens in the city are less enthusiastic about vaccination, 22 percent of the target has been achieved so far | शहरातील नागरिकांचा लसीकरणात उत्साह कमी, आतापर्यंत गाठले २२ टक्के उद्दिष्ट

शहरातील नागरिकांचा लसीकरणात उत्साह कमी, आतापर्यंत गाठले २२ टक्के उद्दिष्ट

Next

संसर्ग माघारल्याने नागरिक बिनधास्त, दुसऱ्या लाटेत केंद्रांवर लागायच्या पहाटे ४ पासून रांगा

अमरावती : शहरातील कोरोना संसर्गाचा ग्राफ माघारल्याने अलीकडे रुग्णसंख्या घटली आहे व याचा थेट परिणाम लसीकरणावर होत आहे. दुसऱ्या लाटेत दररोज हजारांवर संक्रमितांची नोंद होत असताना लसीकरण केंद्रांवर पहाटे ४ पासून रांगा लागायच्या. केंद्रांवर पोलीस बंदोबस्तात लसीकरण झाले आहे. आता संसर्ग कमी झाल्याने नागरिक बिनधास्त झाले व केंद्रांवरील गर्दी कमी झाल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाची साखळी ब्रेक करायची असेल, तर त्रिसूत्रीच्या पालनासह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन महत्त्वाचे आहे. यात कोरोना लसीकरण हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. याद्वारे समाजात सामूहिक रोग प्रतिकारक शक्ती तयार होऊन कोरोना नियंत्रणात आणता येतो. शहरात १६ जानेवारीला हेल्थ लाईन वर्करच्या लसीकरणास सुरुवात झाली. यावेळी पाच केंद्रांवर लसीकरण करण्यात येत होते. त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर व तीन टप्प्यांत आता सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाची लस मोफतमध्ये देण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत १,८३,८१९ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. ही शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत टक्केवारी २२ आहे. यामध्ये दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ६० हजारांच्या सुमारास आहे. ही टक्केवारी ७.५ आहे. आता लसींचा मुबलक पुरवठा होणार असल्याने लसीकरणाचा टक्का वाढणार असल्याचे डाॅ. विशाल काळे यांनी सांगितले.

पाईंटर

शहरात सर्वात जास्त लसीकरण झालेली केंद्रे

पीडीएमएमसी : २४,०५०

डेंटल कॉलेज : १८,०३०

आयसोलेशन : १७,३४५

दस्तुरनगर : १०,५८४

शहरात सर्वांत कमी लसीकरण झालेली केंद्रे

नागपुरी गेट : ५,४४५

सबनिस प्लॉट : ४,३६१

विलासनगर : ३,६४९

बिच्छु टेकडी : ३,३१०

बॉक्स

लसीकरण कमी होण्याची कारणे

संसर्गत कमी आल्याने कोरोनाचे भय कमी झाले. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांवर आलेला आहे. त्यामुळे पहिला डोसनंतर दुसऱ्या डोससाठीचा कालावधी वाढला आहे. याशिवाय किमान तीन आठवड्यांपासून १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण बंद आहे. त्यामुळे लसीकरणात आता घटले आहे.

कोट

लसीकरण सातत्याने सुरू आहे. काही केंद्रे उशिराने सुरु झाल्याने तेथील संख्या कमी दिसते. १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद असल्याने थोडा टक्का माघारला. कोरोनाची साखळी ब्रेक करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे.

- प्रशांत रोडे, आयुक्त, महापालिका

बॉक्स

टक्का वाढण्यासाठी पुरवठ्यात सातत्य हवे

१) लसीचा पुरवठा तोकडा व सातत्य नसल्याने काही केंद्रे बंद राहतात किंवा पुरवठ्यानुसार नियोजन केले जाते. त्यावेळी दुसरा डोस त्यातही ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिले.

२) कोविशिल्डचा पुरवठा जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे बहुतांश केंद्रांवर याच लसीचा वापर होत आहे. त्यात आता आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार दोन डोसमधील अंतर ८४ दिवसांचे केले असल्याने दुसऱ्या डोजसाठी कालावधी बराच आहे.

३) शहरात एप्रिल महिन्यापासून लसीकरणाला मोठी गर्दी झाल्याने काही केंद्रे नव्याने सुरू करण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्या केंद्रावरील लसीकरण कमी दिसत आहे.

४) तीन आठवड्यांपासून १८ ते ४४ वयोगटातील युवांचे लसीकरण बंद आहे. याशिवाय शहरातील काही नागरिकांनी ग्रामीण भागात जाऊन लसीकरण केले आहे. त्यामुळेही काही प्रमाणात घट झाली आहे.

Web Title: Citizens in the city are less enthusiastic about vaccination, 22 percent of the target has been achieved so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.