मॉर्निंगवाकला जाणाऱ्या नागरिकांना अपराध्यासारखी वागणूक देऊ नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:14 AM2021-05-14T04:14:05+5:302021-05-14T04:14:05+5:30

अमरावती : लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वाकला न जाता घरीच व्यायाम, योगा करावा. बाहेर फिरू नये, यात शंका नाही. मात्र, तरीही ...

Citizens going to Morningwalk should not be treated like criminals | मॉर्निंगवाकला जाणाऱ्या नागरिकांना अपराध्यासारखी वागणूक देऊ नये

मॉर्निंगवाकला जाणाऱ्या नागरिकांना अपराध्यासारखी वागणूक देऊ नये

Next

अमरावती : लॉकडाऊनमध्ये मॉर्निंग वाकला न जाता घरीच व्यायाम, योगा करावा. बाहेर फिरू नये, यात शंका नाही. मात्र, तरीही नागरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी माॅर्निंगवाकला जात आहे. गाडगेनगर पोलिसांनी त्यांना पकडून ठाण्यात अपराध्यासारखी वागणूक दिली. मीडियाला बोलावून स्टंटबाजी करून फोटो ग्रॉफी सोशल मीडियावर व्हायरल करून त्यांची बदनामी केली. हा प्रकार योग्य नसल्याचा आरोप शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्रवीण हरमकर यांनी केला. त्यासंदर्भात त्यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांना पत्रसुद्धा दिले.

पोलिसांच्यावतीने अशाप्रकारे कारवाई करून पुन्हा नागरिकांची अवहेलना होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही पोलीस आयुक्तांना सादर पत्रात नमूद केले आहे. अशाप्रकारणी करवाई करून शासनाची व विभागाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच मुख्यमंत्र्यांच्या कामाच्या पद्धतीतून बोध घ्यावा, असा सल्लाही सदर पत्रातून पोलिसांना देण्यात आला.

Web Title: Citizens going to Morningwalk should not be treated like criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.