ग्रामीण भागातील नागरिक ऑनलाईनमुळे लसीकरणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:13 AM2021-05-08T04:13:22+5:302021-05-08T04:13:22+5:30

१८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांना संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक केले आहे. पीएससी अंतर्गत किंवा उपकेंद्रावर लसीकरण सुरू आहे म्हणून नागरिक ...

Citizens in rural areas are deprived of vaccinations due to online | ग्रामीण भागातील नागरिक ऑनलाईनमुळे लसीकरणापासून वंचित

ग्रामीण भागातील नागरिक ऑनलाईनमुळे लसीकरणापासून वंचित

Next

१८ ते ४५ वर्षांवरील नागरिकांना संकेतस्थळावर नोंदणी बंधनकारक केले आहे. पीएससी अंतर्गत किंवा उपकेंद्रावर लसीकरण सुरू आहे म्हणून नागरिक उत्साहाच्या भरात लसीकरणाला जातात. परंतु तेथे लसीकरण न होता खाली हाताने परत येतात. ग्रामीण भागातील नागरिक अशिक्षित असल्याने त्यांना ऑनलाईन नोंदणी करता येत नाही. तसेच त्यांच्याकडे मोबाईल सुविधा नसल्यामुळे त्यांना ही पद्धत समजायला मार्ग नाही शुक्रवारी कोकर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण झाले. त्यात १०० टक्के बाहेरगावच्या नागरिकांचे लसीकरण झाले. त्यात स्थानिक एकही नागरिक लसीकरण झालेले नसावे.

आज कोकर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत लसीकरण झालेले बाहेरगावचे नागरिक

दर्यापूर, अंजनगाव, परतवाडा, वर्धा, अमरावतीहून आले व आपला पानगा शिजवून गेले. कारण

अमरावतीहून परतवाडा येणारे नागरिक लस घेण्यासाठी आपला प्लॅटफॉर्म बदलून ते कोणत्याही ठिकाणी जिथे गर्दी होणार नाही किंवा लसीकरण होणार अशा ठिकाणी आपला फ्लॅट (जागा)बदलून ऑनलाईन पद्धतीने नोंद केलेले नागरिक लसीकरण करून घेतात. त्यामुळे स्थानिक असलेल्या प्राथमिक आरोग्य अंतर्गत नागरिक या मोबाईल किंवा ऑनलाइन पद्धतीमुळे वंचित राहत आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन गोरगरीब जनतेच्या लसीकरणासाठी ती नोंदणी ऑफलाइन करावी, अशी मागणी नागरिकांची आहे.

---

कोट

नागरिकांची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने तसे पत्रदेखील आम्ही लेखी स्वरूपात वरिष्ठांकडे पाठविले आहे. आम्ही शासनाच्या आदेशाने ही ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे. या बाबीचा विचार होईल. तसे आमचे बोलणे सुरू आहे.

- दिलीप रणमाळे,

जिल्हा आरोग्य अधिकारी, अमरावती

Web Title: Citizens in rural areas are deprived of vaccinations due to online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.