नागरिक सोडू लागले गाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 01:17 AM2018-08-31T01:17:24+5:302018-08-31T01:17:47+5:30
भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज यामुळे नागरिक घाबरून गेलेले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासोबत सुविधांंची व परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी....
अमरावती/धारणी : भूगर्भातील हालचाली, कंपने व आवाज यामुळे नागरिक घाबरून गेलेले आहेत. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासोबत सुविधांंची व परिसराची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून अप्पर जिल्हाधिकारी के.पी. परदेशी व निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे आदी गुरुवारी दुपारी या गावांमध्ये दाखल झाले आहेत.
साद्राबाडी येथे भूगर्भातून दोन आठवड्यांपासून आवाज येत आहेत. मात्र, २१ आॅगस्टला जबर धक्का बसला. घरांना तडे गेले व नागरिकांनी गावाबाहेर राहणे पसंत केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला जाग आली. येथे दाखल झालेल्या दोन्ही पथकांनी या धक्क््यांचा थरार अनुभवला. एससीएसचे पथकप्रमुख बलबीरसिंग यांच्याशी संवाद साधून ‘लोकमत’ने वास्तव मांडल्यानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागे झाले. गुरुवारी दुपारी जिल्हा महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी येथे दाखल झाले आहेत.
गावात पोलीस बंदोबस्त
भूकंपाच्या भीतीने नागरिक मैदानातील तंबूमध्ये रात्र काढत आहेत तसेच भिंतीला भेगा गेल्यामुळे अशा घरांमध्ये राहण्यास नागरिकांना स्थानिक प्रशासनाने मज्जाव केला. त्यामुळे या घरांना कुलूप आहे. चोरीच्या भीतीने पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. तंबू अपुरे पडू नयेत, यासाठी साद्राबाडीत नव्याने आठ तंबू उभारण्यात आल्याची माहिती धारणीचे तहसीलदार आदिनाथ गांजरे यांनी दिली.