दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त; लिकेज दुरुस्तीवर वाहिली फुले 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:23 AM2023-01-18T10:23:00+5:302023-01-18T10:28:34+5:30

पालिका घेत आहे ‘त्या’ व्यक्तीचा शोध

Citizens suffering due to contaminated water; showered flowers on the leakage repair | दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त; लिकेज दुरुस्तीवर वाहिली फुले 

दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त; लिकेज दुरुस्तीवर वाहिली फुले 

Next

परतवाडा (अमरावती) : अचलपूर नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षित कार्यप्रणालीने नागरिक त्रस्त आहेत. दूषित, गढूळ, आणि आरोग्यास अपायकारक घटक असलेले पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. दरम्यान यामुळे त्रस्त अज्ञात नागरिकांनी लिकेज दुरुस्तीवर चक्क फुले वाहिली. संक्रांतीच्या तोंडावर वाहिली गेलेली ही फुले चांगली चर्चेत असून ‘त्या’ व्यक्तीचा शोध पालिका घेत आहे.

अचलपूर-परतवाडा जुळ्या नगरीतील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची जबाबदारी अचलपूर नगरपालिकेने स्वीकारली आहे. चंद्रभागा प्रकल्पावरून हे शुद्ध पाणी पुरविणे अपेक्षित आहे. त्याकरिता शहरात कोट्यावधी रुपये खर्ची घातल्या गेले आहेत. ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या आहेत. यात अमृत योजनेचीही भर पडली आहे.

अमृत मधला घोळ सर्वश्रुत आहे. तो घोळ निस्तारायला, त्याची प्रामाणिकपणे चौकशी करायला, आणि दोषींवर कारवाई करायला कोणीही तयार नाही. केवळ संबंधिताला आर्थिक लाभ पुरविण्यातच ते धन्यता मानत आहेत. त्यामुळे हे अमृत, विष ठरत आहे. नागरिकांच्या जीवावर उठले आहे.

ज्या टाक्यांमधून नागरिकांना नळ योजनेंतर्गत पाणी पुरविल्या जाते त्या टाक्यांची अनेक वर्षांपासून स्वच्छता नाही. या टाक्या धुतल्याच गेलेल्या नाहीतरी. या टाक्यांमध्ये आरोग्यास अपायकारक वस्तूंसह कचरा-काडी व गाळ साचला आहे.

पाइपमध्ये रबरी तुकडे, प्लास्टिकच्या पन्नी

ज्या पाइपमधून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो, त्यामध्ये रबरी तुकडे, प्लास्टिकच्या पन्न्या अडकल्याने येणाऱ्या पाण्याचा वेग मंदावला आहे. नळात अडकलेल्या व निघत असलेल्या पन्नी, प्लास्टिकच्या वस्तूंचा एक व्हिडिओ नागरिकांनी व्हायरल केला आहे. हा व्हिडिओ पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षित कारभाराला उघड करण्यास पुरेसा ठरला आहे.

पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती

पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागली आहे. सांडपाण्याच्या नालीतील घाण पाणी त्या लिकेजेस मधून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. नळाच्या पाण्यातून चामडोकसह जंतू निघत आहेत. गढूळ दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. दरम्यान लिकेज दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Web Title: Citizens suffering due to contaminated water; showered flowers on the leakage repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.