रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी नागरिकांना घरबसल्या मिळणार युनिव्हर्सल ई-पास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:17 AM2021-08-24T04:17:15+5:302021-08-24T04:17:15+5:30

(असायमेंट) अमरावती : कोविड निर्मूलन तसेच कोविडच्या प्रसाराला ब्रेक लावण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून करोना प्रतिबंधक ...

Citizens will get Universal E-Pass at home for mall access including train and air travel! | रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी नागरिकांना घरबसल्या मिळणार युनिव्हर्सल ई-पास!

रेल्वे, हवाई प्रवासासह मॉल प्रवेशासाठी नागरिकांना घरबसल्या मिळणार युनिव्हर्सल ई-पास!

Next

(असायमेंट)

अमरावती : कोविड निर्मूलन तसेच कोविडच्या प्रसाराला ब्रेक लावण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करता यावा, यासाठी ई-पास सेवा सुरू केली आहे. ही पास दाखविल्यावरच आता रेल्वे, हवाई प्रवासासह मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. ईपासएमएसडीएमए डॉट एमएएचएआयटी डॉट ओआरजी या संकेतस्थळावर जावून ही ई-पास घरबसल्या नागरिकांना मिळविता येणार आहे.

कोट

राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून करोना प्रतिबंधक लशींचे दोन्ही डोस घेतलेल्यांना प्रवास करता यावा, यासाठी ई-पास सेवा सुरू केली आहे. सर्वसामान्यांना ई-पास अगदी सहज उपलब्ध होण्यासाठी युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास सिस्टम विकसित केली आहे. याचा लाभ नागरिकांनी घ्यावा.

- नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती.

बॉक्स

असा मिळवा ई-पास

१) पात्र नागरिकांनी https://epassmsdma. mahait.org ही वेब लिंक उघडावी.

२) त्यातील ‘ट्रॅव्हल्स पास फॉर व्हॅक्सिनेटेड सिटिझन्स’ यावर क्लिक करा.

३) त्यानंतर आपला कोविड लसीकरणासाठी नोंदविलेला मोबाईल क्रमांक नमूद करावा. लगेच मोबाईलवर ओटीपी अर्थात एकवेळ वापरासाठीचा पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.

४) हा ओटीपी नमुद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.

५) त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.

६) त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोविड लसीचा पहिला डोस आणि दुसरा डोस घेतल्याची दिनांक इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.

७) ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या २४ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पासकरिता लघुसंदेश (एसएमएस) द्वारे लिंक प्राप्त होईल.

या तपशीलमध्ये ‘सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वत:चे छायाचित्र अपलोड करावे. ते मोबाईल गॅलरीतून अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेराद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढूनदेखील अपलोड करता येईल.

८) लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाईलमध्ये जतन (सेव्ह) करून ठेवावा.

-------------------

दाेन्ही डोस घेतले किती?

फ्रंट लाईन वर्कर्स : ६५०४८

आराेग्य कर्मचारी : ३९४४५

१८ ते ४४ वयोगट : २५८२५८

४५ पेक्षा जास्त वयाचे : ९८३७७९

दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण (टक्क्यात) : ७२

Web Title: Citizens will get Universal E-Pass at home for mall access including train and air travel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.