शहरबस दरवाढ दुपटीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 12:53 AM2018-12-21T00:53:27+5:302018-12-21T00:55:16+5:30

शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.

The city buses doubled! | शहरबस दरवाढ दुपटीने!

शहरबस दरवाढ दुपटीने!

Next
ठळक मुद्देप्रवाशांना सुविधा कुठे? : डिझेलच्या दरवाढीचे दर्शविले कारण

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहर बससेचे दर वाढविण्याचा निर्णय मागील आमसभेत घेण्यात आला. त्यानंतर लगेच शहर बस सेवेचे दर दुपटीने वाढविण्यात आले. यासाठी डिझेल दरवाढीचे कारण देण्यात आले असले तरी प्रवास भाडेवाढ केली असली तरी प्रवाशांना सुविधेचा अभाव असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहे.
शहर बससेवेच्या प्रवासी वाहतुकीचे दर डिझेल ५६ रूपये लिटर असतानाचे आहेत. आता डिझेलचे ७५ दर झाल्याने शहर बससेवेच्या प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच्या आमसभेत सभापतींनी मांडला असता, ही भाववाढ कशा पद्धतीची राहील, याविषयीचा प्रस्ताव पहिले सभागृहासमोर ठेवावा, अशी मागणी काही सदस्यांनी केली होती. मात्र, याच आमसभेत प्रवास भाडेवाढीस मंजुरी दिली होती. त्यामुळे शहर बस वाहतुकीत सुविधा वाढवाव्यात, अशी मागणी होत आहे.
महापालिकेचा शहर बससेवेचा कंत्राट ज्या कंपनीकडे आहे, त्यांच्याद्वारा अनेक मार्गांवर बससेवा मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. या कंपनीद्वारा शहरात केवळ २५ बसेसद्वारा वाहतूक सुविधा देण्यात येते. मात्र, शहराचा विस्तार झाल्याने ही सेवा तोकडी पडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
महापालिका क्षेत्रात सन २००६ पासून शहर बससेवा उपक्रम राबवित आहेत. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाद्वारा १ मार्च २०१४ पासून सुधारित तिकिटांच्या दरपत्रकास मंजुरी प्रदान केल्यानंतर याच दराने आतापर्यंत तिकीट विक्री करण्यात येत होती. डिझेलचे दर व वाहानाचे सुटे भाग यांच्या दरात वाढ झाल्याने तिकिटांच्या दरात वाढ करण्याची मागणी कंत्राटदाराने केली होती.
या दरवाढीच्या प्रस्तावास आयुक्तांनी एक सप्टेंबर व प्राधिकरणाने ९ आॅक्टोबर रोजी मंजुरी प्रदान केलेली आहे. आता आमसभेच्या मंजुरीनंतर ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांचा याला विरोध आहे.
अशी झाली दरवाढ
सध्या दोन किमी अंतरापर्यंत प्रौढांचे आठ रूपये, तर बालकांचे चार रूपये, दोन ते चार किमी अंतरापर्यंत प्रौढांचे दहा रूपये, तर बालकांचे पाच रूपये, चार ते सहा किमी अंतरापर्यंत प्रौढांचे १३ रूपये, तर बालकांचे सात रूपये, सहा ते १० किमी अंतरांपर्यंत प्रौढांसाठी १५ रूपये व बालकांसाठी आठ रूपये, दहा ते १४ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २० रूपये, तर बालकांसाठी १० रूपये, १४ ते १८ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २५ रूपये, बालकांसाठी १३ रूपये व १८ ते २२ किमी अंतरापर्यंत प्रौढांसाठी २८ रूपये व बालकांसाठी १४ रूपयांनी ही दरवाढ झालेली आहे.
२० किमीपर्यंत सेवाही विस्तारणार
शहरालगतच्या नांदगाव पेठ एमआयडीसी, वलगाव, भातकुली, ांजनगाव बारी, कोंडेश्वर, लोणी आणि एसआरपीएफजवळील वैष्णोदेवी मंदिरापर्यत शहर बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणावरून अमरावती शहरासाठी ही बससेवा राहणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शहरालगतच्या या भागातील नागरिकांचे दैंनदिन व्यवहार शहराशी असतांना या ठिकाणी बससेवेचा अभाव असल्यामुळे नागरिकांना अ‍ॅटोशिवाय पर्याय नव्हता . याविषयीचा प्रस्ताव जिल्हा वाहतुक प्रधिकरणाकडे पाठविलाअसल्याची माहिती आहे.

Web Title: The city buses doubled!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.