शहर काँग्रेसचा बैलबंडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 11:07 PM2018-01-29T23:07:57+5:302018-01-29T23:08:21+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोमवार, २९ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्र्थ शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी व सायकल मोर्चा नेला.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार सोमवार, २९ जानेवारी रोजी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या निषेधार्र्थ शहर काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी व सायकल मोर्चा नेला. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. शहर अध्यक्ष किशोर बोरकर, माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
राज्यात इंधनावर व्हॅटसह विविध प्रकारचे सरचार्ज लावले जात आहेत. दुष्काळाच्या नावाखाली कर लावून लूट सुरू असल्याचा आरोप किशोर बोरकर यांनी केला. पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला झळ पोहोचत आहेत. त्यामुळे ‘अच्छे दिन’चे स्वप्न रंगवणाºया जनतेच्या नशिबी बुरे दिन आल्याचा आरोप रावसाहेब शेखावत यांनी केला. पेट्रोल-डिझेल जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी शहर काँग्रसने निवेदनातून केली. आंदोलनात माजी कुलगुरू गणेश पाटील, मनपा पक्षनेता बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, बी.आर. देशमुख, पुरुषोत्तम मुंदडा, प्रल्हाद ठाकरे, हरिभाऊ मोहोड, राजेश चव्हाण, अभिनंदन पेंढारी, राजीव भेले, संजय मापले, संजय वाघ, राजा बांगळे, माजी मंत्री यशवंत शेरेकर, सुरेश कनोजिया, संजय बोबडे, अभय ढोबळे, जयश्री वानखडे, देवायनी कुर्वे, अर्चना सवाई, सविता धांडे, वंदना थोरात, अनिला काजी, करिमा बाजी, जया बद्रे, योगिता गिरासे, वंदना सुरळकर यांच्यासह पदाधिकारी, कायकर्ते उपस्थित होते.