पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात शहर काँग्रेसचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:34 PM2017-09-18T22:34:31+5:302017-09-18T22:34:50+5:30

भाजप, शिवसेना सरकार मनमानी कारभार करीत असून पेट्रोल, डिझेलची दरवाढीतून जनतेचे आर्थिक शोषण करीत आहे.

City Congress of Elgar against petrol, diesel hike | पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात शहर काँग्रेसचा एल्गार

पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात शहर काँग्रेसचा एल्गार

Next
ठळक मुद्देआंदोलन : जिल्हाधिकाºयांना मागणीचे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : भाजप, शिवसेना सरकार मनमानी कारभार करीत असून पेट्रोल, डिझेलची दरवाढीतून जनतेचे आर्थिक शोषण करीत आहे. त्यामुळे सततच्या या दरवाढीचा निषेध करण्यासाठी सोमवारी शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रतिलिटर ७९.४१ रूपये असताना राजधानी दिल्लीत हेच पेट्रोल ७० रूपये, चेन्नईत ७२ व कलकत्ता येथे ७३ रूपये दराने विक्री होत आहे. या दरवाढीमुळे महागाईचा आलेख वेगाने वाढत असून अन्नधान्य, दुधापासून सर्वच जीवनावश्यक वस्तुंच्या किमती वाढणार आहेत. याचा फटका सर्वसामान्याला बसणार आहे. दरवाढीचा थेट परिणाम उद्योग, लघु उद्योग व्यवसायावरही होणार आहे. माल वाहतूक महागणार आहे. भाजप-सेना सरकारने पेट्रोल डिझेलवर विविध प्रकारचे सेस लावल्यामुळे ही दरवाढ होत आहे. या प्रकाराविरोधात व पेट्रोल, डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी निवेदनाव्दारे अपर जिल्हाधिकारी के.आर.परदेशी यांच्यामार्फत सरकारकडे करण्यात आली आहे. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष किशोर बोरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, भैय्या पवार, गोपाळकृष्ण निचळ, नसीम खान, राजा बांगळे, राजेश चव्हाण, वंंदना कंगाले, शेख आसिफ, हरिभाऊ मोहोड, अभिनंदन पेंढारी, देवयानी कुर्वे, अर्चना सवाई, जयश्री वानखडे, अनिल माधोगडीया, पुरूषोत्तम मुंदडा, नानाभाई सोनी, बबार कुरेशी, मंगेश मोरे, राहूल येवले आदी उपस्थित होते.

Web Title: City Congress of Elgar against petrol, diesel hike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.