शहर कॉंग्रेसने केला भाजप सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:52+5:302021-09-25T04:12:52+5:30

आंदोलन; जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घेण्याची मागणी अमरावती : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या केलेल्या दरवाढीचा फायदा ...

City Congress protests BJP government | शहर कॉंग्रेसने केला भाजप सरकारचा निषेध

शहर कॉंग्रेसने केला भाजप सरकारचा निषेध

Next

आंदोलन; जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ मागे घेण्याची मागणी

अमरावती : केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंच्या केलेल्या दरवाढीचा फायदा केवळ मोजक्याच दोन ते तीन मोठ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे. सर्वसामान्यांच्या आटोक्याबाहेर गेलेल्या या दरवाढीमुळे सर्व सामान्य जनता त्रस्त आहेत. त्यामुळे केंद्रातील भाजप सरकारचा शुक्रवारी शहर कॉंग्रेस कमेटीचा निषेध केला. यावेळी महागाई कमी करण्यात यावी आणि बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे शहराध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री सुनील देशमुख,माजी महापौर विलास इंगोले, महा. प्रदेश दिव्यांग विकास सेलचे प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर यांचे नेतुत्वातील कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदनाव्दारे केली आहे.

भाजप सरकारच्या जनहितविरोधी धोरणामुळे जीवनावश्यक वस्तुंचे दर वाढले आहेत. या दरवाढीचा फायदा केवळ दोन ते तीन मोजक्याच व्यापाऱ्यांना मदत करण्याकरीता गरीब सामान्य माणसांच्या आटोक्याच्या बाहेर गेलेले आहे. या दरवाढीमुळे संपूर्ण देशातील सर्व सामान्य जनता विविध पातळीवर अत्यंत त्रस्त आहे. तसेच या दरवाढीमुळे सामानञय जनतेस कुटूंब चालविणे कठीण आहे.या परिस्थितीसुध्दा केंद्रातील भाजप सरकार मुठभर व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी देशातील जनतेला रस्त्यावर आणून ठेवले आहे. देशात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे शहर कॉंग्रेसने केंद्रशासनाने महागाई आटोक्यात आणून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शहर कॉंग्रेसने केली आहे.यावेळी आंदोलनात शहराध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री सुनील देशमुख, माजी महापौर विलास इंगोले, महा. प्र. अंपग विकास सेल प्रदेशाध्यक्ष किशोर बोरकर, प्रदीप हिवसे, साहीक शाह, राजू भेले, संजय वाघ, फिरोज खान, अभिनंदन पेंढारी, विनोद मोदी, दीपक लोखंडे, किशोर रायबोले, रज्जू बाबा, सलीम मिरावाले, राजा बांगडे, भैयासाहेब निचळ, शोभा शिंदे, वंदना कंगाले, अनिला काझी, देवायानी कुर्वे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले आहे.

Web Title: City Congress protests BJP government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.