शहरात गावठी, अवैध दारूचा महापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 10:00 PM2018-09-11T22:00:40+5:302018-09-11T22:01:18+5:30

शहरात गावठी दारूसह अवैध देशी दारूचा महापूरच असल्याचे पोलिसांनी दोन दिवसांत केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांत अवैध देशी दारूच्या २६, तर गावठी दारूसंबंधी पाच कारवाया करून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

In the city, flood of illicit liquor | शहरात गावठी, अवैध दारूचा महापूर

शहरात गावठी, अवैध दारूचा महापूर

googlenewsNext
ठळक मुद्देदोन दिवसांत ३१ कारवाया : पोलिसांचे दुर्लक्ष कारणीभूत?

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात गावठी दारूसह अवैध देशी दारूचा महापूरच असल्याचे पोलिसांनी दोन दिवसांत केलेल्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. दोन दिवसांत अवैध देशी दारूच्या २६, तर गावठी दारूसंबंधी पाच कारवाया करून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यावरूनच आजपर्यंत शहरात अवैध दारूची विक्री सुरू असल्याचे दिसून येत असून, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष का केले, हा संशोधनाचा विषय आहे.
गेल्या वर्षात मुंबईत अवैध दारूविक्रेत्याकडील विषाक्त दारू प्यायल्याने तब्बल शंभर जण दगावले होते. त्यावेळी राज्यभरातील गावठी दारूविक्री अड्ड्यांवर धाडसत्र राबवून शेकडोंना ताब्यात घेऊन त्याच्यांकडील हजारो लिटरची दारू नष्ट करण्यात आली होती. अमरावती पोलिसांनीही मोहीम राबवून अनेक कारवायांची नोंद केली होती.
नवे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या कार्यकाळात पुन्हा अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाईचा सपाटा पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, नव्या पोलीस आयुक्तांना दाखविण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पुन्हा या कारवाया सुरू केल्या असाव्यात, अशी शंका उपस्थित होत आहे.
दरम्यानच्या काळ्यात अवैध दारूविक्रेत्यांना सुट मिळाल्याने त्यांचे धंदे चांगलेच फोफावले होते. याचा अंदाज सद्यस्थितीत सुरू असलेल्या कारवायांवरूनच सहज लक्षात येऊ शकते.
देशी दारूच्या अवैध व्यवसायाला उधाण
दोन दिवसांत दहाही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध देशी दारूच्या विक्रीला उधाण आले होते.
पोलिसांनी विविध ठिकाणी धाडी टाकून अवैध देशी दारूविक्रेत्यांकडून २४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. रुक्साना युसूफ गोचेवाले (रा. कुंभारवाडा), दिनेश भीमराव बगेल (३२, रा. हातुर्णा), अतिश कल्याण जवंजाळ (२४, रा. वलगाव), बय्यो छोटू चौधरी (रा. कुंभारवाडा), चंदू डोमाजी गजभिये (४०, रा. कवठा बहाळे), राजहंस बापूराव गोंडाणे (६०, रा. संजय गांधीनगर), पंकज सूरज तायडे (रा. रमाबाई आंबेडकरनगर), सुरेश दादू निखरे (रा. मांडवा झोपडपट्टी), इक्बाल सुभाष चौधरी (३०), विजय महादेव कदम (३२, रा. बडनेरा), मो. मुशर्र्रफ मो. अशरफ (रा. हबीबनगर), धोंडू दत्तजी गाडे (६०, रा. खारतळेगाव), नरेश गणेश हरदो (४९, रा. बाजारपुरा), महबूब शाह सब्जू शाह (५५, रा. वलगाव), सूरज धनराज ढोके (रा. रहाटगाव), गुड्डू बाबूलाल कुरवाने (रा. चिचफैल), अजय पांडुरंग माहुलकर (रा. बेलपुरा), राहुल गणेश प्रधाने (रा. महाजनपुरा), रघुनाथ नामदेव रंधवे (रा. खरकाडीपुरा), सुभाष हरिभाऊ राणे (रा. गणोरी), संतोष वासुदेव कनोजे (रा. कुंभारवाडा), जगदीश माणीक सयाम (रा. चिचफैल), प्रमोद नत्थूआपा चिकाटे (४०, रा. मायानगर) व काही महिलांचाही आरोपींमध्ये सहभाग आहे. पोलिसांच्या कारवायांमध्ये सातत्य राहील काय, याचीदेखील चर्चा झडत आहे.
१७ हजार ६०० रुपयांची गावठी दारू जप्त
फे्रजरपुरा हद्दीत सर्वाधिक गावठी दारूची विक्री होत असल्याचे यापूर्वीही निदर्शनास आले आहे. सोमवारी फे्रजरपुरा पोलीस व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वडाळी स्थित परिहारपुरा येथे धाडसत्र राबवून तब्बल १७ हजार ६०० रुपयांची गावठी दारू, मोहाचा सडवा जप्त केला आहे. बाली भीमराव बेनीवाले व चार महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: In the city, flood of illicit liquor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.