शहराला वायू प्रदूषणाचा धोका नाही
By admin | Published: June 4, 2014 11:23 PM2014-06-04T23:23:13+5:302014-06-04T23:23:13+5:30
जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जगातील ९१ देशामधील १६00 शहरांचा हवेच्या गुणवत्तेबाबत नुकताच अहवाल प्रकाशित करण्यात आला. मात्र या अहवालात अमरावतीला वायू प्रदूषणाचा धोका नाही,
मुलाखत : महापालिका पर्यावरण संवर्धन अधिकार्यांची माहिती
अमरावती : जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने जगातील ९१ देशामधील १६00 शहरांचा हवेच्या गुणवत्तेबाबत नुकताच अहवाल प्रकाशित करण्यात आला. मात्र या अहवालात अमरावतीला वायू प्रदूषणाचा धोका नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ९७ मायक्र ोग्रॅम क्युबिक ३ हे वायू प्रदूषणाचे प्रमाण विकसनशील शहरासाठी धोकादायक नसल्याचा माहिती महापालिकेचे पर्यावरण संवर्धन अधिकारी महेश देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गुरुवार ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन असल्याच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांच्याशी शहराच्या वायूप्रदूषणाबाबत चर्चा केली असता त्यांनी वायूप्रदूषणाचा शहराला कोणताही धोका नसल्याचे सांगितले. हवेच्या गुणवत्ताबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गोळा केला जातो. त्यानंतर हा अहवाल कें द्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळास पाठविला जातो. ही आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेला दिली जाते. ऐतिहासिक शहरे, औद्योगिक केंद्र, खानकाम उद्योग असणारी शहरे, किंवा विभागीय ठिकाणांचा हवेचा गुणवत्तेबाबतची तपासणी केली जाते. त्याचअनुषंगाने २00८ ते २0१३ या कालावधीत अमरावती शहराच्या हवेच्या गुणवत्तेची आकडेवारी जागतिक आरोग्य संघटनेला कळविण्यात आले. जागतिक पातळीवर हवा प्रदूषणाबाबत विकसित देश, विकसनशील देश व अविकसित देश अशी विभागणी करण्यात आली. विकसनशील देशाची औद्योगिकीकरणाची तीव्र गती, लोकसंख्यावाढ, कच्चा मालाची उपलब्धता, पक्क्या मालाची बाजारपेठ, जीवनशैलीतील बदल आदी कारणामुळे जागतिक पातळीवर कुठल्याही विकसनशील देशाची हवा प्रदूषण पातळी ही ७0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ ते १५0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ च्या दरम्यान म्हणजे काही प्रमाणात अधिक आढळून आले. भारताचा विचार केल्यास जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार पर्टिक्युलेट मॅटर १0चे हवेतील प्रमाण औद्योगिक क्षेत्रात १२0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३, रहिवासी क्षेत्रात ६0 मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ पर्यंंत परमिशेबल आहे. अमरावती शहराचे प्रमाण ९७ मायक्रो ग्रॅम क्युबिक ३ असे असून काहींना हे प्रमाण जास्त वाटत असले तरी सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, एसपीएमचे प्रमाण परमिशेबल लिमिटपेक्षा कमी आहे. प्रदूषण मानांकाची उच्चतम पातळी विकसित देशामध्ये जास्तीची असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालातून लक्षात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. दरवर्षी वायूप्रदूषणामुळे जागतिक पातळीवर १५ लक्ष लोक मृत पावल्याचे या अहवालात नमूद आहे. आरोग्य संपन्न जीवन जगण्यासाठी हवेची स्थिती महत्त्वाची आहे. साधारणत: हवेची स्थिती विरळ, लोकसंख्येचे ठिकाणी, निसर्गाचे प्राबल्य असणारे ठिकाण हे अधिक चांगले ठरते. यामध्ये चिखलदरा, मेळघाट, सेमाडोह किंवा दुर्गम भागातील वसाहती यांचा समावेश केला जाऊ शकतो. आरोग्यसंपन्न जीवन जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. परंतु निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या साधन सामग्रीचा उपयोग करूनच पुढे गेल्यास पर्यावरण संतुलन कायम राहील, असे देशमुख यांनी सांगितले.