शहर काँग्रेसची जिल्हाकचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 01:13 AM2017-10-14T01:13:12+5:302017-10-14T01:13:31+5:30
केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : केंद्र व राज्य शासनाने ऐन दिवाळीच्या तोंडावर गोर-गरिबांना रेशन दुकानातून दिली जाणारी साखर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप शासनाच्या या निर्णयाचा शहर काँग्रेसने निषेध केला. हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करीत जिल्हाकचेरीवर शुक्रवारी धडक दिली. यावेळी माजी आमदार रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे शहराध्यक्ष किशोर बोरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना निवेदन सोपविण्यात आले.
भाजप सरकारने शेतकºयांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ दिला नाही. अशातच वाढत्या महागाईमुळे गोरगरीब नागरीकांचे जगणे कठीण झाले आहे. परिणामीे जनतेत संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरीत मागे घेण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सध्या राज्यभरातील ४५ लाख कुटुंबांना रेशन दुकानातून मिळणारी साखर बंद केली आहे. परिणामी या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील ३ लाखांवर एपीएल, बीपीएल कार्डधारकांना बसला आहे. प्रत्येकी ५ युनिट याप्रमाणे व्यक्तीनुसार महिन्याकाठी १ लाख ८३ हजार २६२ क्विंटल साखर बंद केली आहे. त्यामुळे शासनाने अंत्योदयसह एपीएल, बीपीएल, कार्डधारकांना रेशन दुकानातून पूर्वरत दिवाळीपूर्वी साखर वाटप करावे, काँग्रेस सरकारच्या काळात देशातील गरिबांसाठी सुरू केलेल्या अंत्योदय योजनेत तीन रूपये किलो तांदूळ, २१ रुपये किलो गहू व १ रुपये किलो ज्वारी ही योजना नियमितपणे सुरू करावी, आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाकडे पाठविले आहे. यासंदर्भात योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिति बांगर यांनी दिले. यावेळी विलास इंगोले, बबलू शेखावत, माजी आ. केवलराम काळे, हरीभाऊ मोहोड, पुरूषोत्तम मुंदडा, अभिनंदन पेंढारी, उत्तमराव भैसने, सुरेश स्वर्गे, चंद्रभागा इंगोले, योगिता गिरासे, राहूल येवले, अक्षय भुयार, मनोज भेले, अनिल माधोगडीया, मिर साजीद अली, भैय्यासाहेब निचळ, बी.आर. देशमुख, नाना सोनी, वंदना कंगाले, देवायनी कुर्वे, संजय वाघ, साहेबराव घोगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रेशन दुकानासमोर लागणार फलक
शहरासह जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये धान्याचे दरफलक नाहीत. त्यामुळे रेशनकार्ड धारकांना दुकान उघडण्याची व बंद होण्याची वेळ कळत नाही. एवढेच नव्हे तर दूकाने बरेचदा बंद असतात. त्यामुळे धान्यापासून लाभधारक वंचित राहतात, ही बाब लक्षात घेता रविवारीही दुकाने सुरू ठेवावीत. फलकावर तक्रारीसाठी टोल फ्रि क्रमांक,संर्पकासाठी अधिकाºयांचे नाव व मोबाईल नंबर असावा, अशी मागणी किशोर बोरकर यांनी केली. ही मागणी जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तुर्तास मान्य केली.