शहर कोतवाली पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:12 AM2021-05-27T04:12:32+5:302021-05-27T04:12:32+5:30

शहर कोतवाली चौघांविरुद्ध गुन्हा अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मास्क न लावता फिरणाऱ्या चौघांविरुद्ध कलम १८८ अन्वये ...

City Kotwali Crimes against five persons | शहर कोतवाली पाच जणांविरुद्ध गुन्हा

शहर कोतवाली पाच जणांविरुद्ध गुन्हा

Next

शहर कोतवाली चौघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : शहर कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मास्क न लावता फिरणाऱ्या चौघांविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. यामध्ये आशिष तात्याजी उके (२८, रा. अब्दुलपुरा, चांदूरबाजार), राजकुमार लक्ष्मणदास धुंडीयाल (४५, रा. शिवमंदिर, दस्तुरनगर), विजय सच्चानंद लुल्ला (४२, रा. फरशी स्टॉप) यांचा समावेश आहे.

चित्रा चौकातील दुकानदाराविरुद्ध गुन्हा

अमरावती : संचारबंदीचा आदेश असतानाही मनाई असलेल्या वस्तूचे दुकान उघडून विक्री करणारा गुवाब बिखचंद पिंजानी (५५, रा. रामपुरी कॅम्प) याच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला. चित्रा चौकात २५ मे रोजी ही कारवाई करण्यात आली

.

मोची गल्लीतील दुकानदाराविरुद्ध गुन्हा

अमरावती : संचारबंदीदरम्यान मनाई असताना दुकान उघडून साहित्याची विक्री करणारा राजू कुंदनलाल सायद (३७, रा. मोची गल्ली) याच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविला. २५ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

------------

अकारण घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई

अमरावती : शहर कोतवाली पोलिसांनी मास्क न लावता अकारण घराबाहेर पडलेल्या व्यक्तींविरुद्ध कारवाई केली. यामध्ये आयुष प्रकाश बजाज(२३), गौरव प्रकाश बजाज (१९, रा. शंकरनगर), विकास सुरेंद्र जोशी (४२, तिघेही रा. शंकरनगर) व मुकेश नंदलाल बसंतवाणी (४१) यांचा समावेश आहे. २५ मे रोजी त्यांच्याविरुद्ध कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

--------------

बडनेरा तिघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी शेख मतीन शेख महबूब (४२, रा. नूरनगर, जुनी वस्ती), मोहम्मद शकील मोहम्मद नसीर (४०, रा. मोमिनपुरा, नवीवस्ती), सुखदेव बाबुराव सातारकर (६५, रा. संभाजीनगर, नवीवस्त) यांच्याविरुद्ध कलम १८८ तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. २४ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

------------------

रस्त्यावर बेशुद्ध झालेल्या युवकाची दुचाकी पळविली

भातकुली : अमरावती शहरातील गणेश कॉलनी येथे एका व्यक्तीकडे कामाला असलेल्या योगेश मनोहरराव शेंद्रे (३७, रा. विर्शी) यांनी पुतण्याची एमएच २७ एपी ८८७२ क्रमांकाची दुचाकी आणली होती. कुंभारवाडा ते ऑक्सिजन पार्क या मार्गात कामानिमित्त गेले असताना, चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. एक तासानंतर त्यांना शुद्ध आली तेव्हा दुचाकी त्यांच्याकडे नव्हती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली. २४ मे रोजी सकाळी ११.३० ते १२.३० दरम्यान ही घटना घडली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

---------------------------

वरूड येथून दुचाकी लंपास

वरूड : शहरातील आंडेवाडी येथे साळा प्रशांत धुर्वे यांच्या घरापुढे लावलेली दुचाकी (एमएच ४० ई ९८६२ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार प्रकाश मन्साराम परतेकी यांनी वरूड पोलीस ठाण्यात २४ मे रोजी दाखल केली. २२ मे रोजी सकाळी साडेअकरा ते साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

--------------

हसनापूर फाट्यावरून दुचाकी लंपास

अंजनगाव सुर्जी : संत्र्याचा बगीचा पाहण्यासाठी केलेल्या व्यापाऱ्याची हसनापूर फाट्यावरून एमएच २७ सी ७८६४ क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. २४ मे रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेची तक्रार व्यापारी याकुब खान मिया खान पठाण (६७, रा. भंडारज) यांनी अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात दाखल केली. पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा नोंदविला.

----------------

नळावरील भांडणात महिलेच्या कानावर मारली बकेट

मंगरूळ दस्तगीर : नजीकच्या गोकुळसरा येथे नळावर पाणी भरण्याच्या वादातून ६५ वर्षीय महिलेला शेजारी राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने बकेट कानाजवळ मारून जखमी केले. त्यांचा वाद सुरू असताना मारहाण करणाऱ्या महिलेचा मुलगा मयूर गोविंदराव महल्ले (२५) आला आणि त्याने वृद्ध महिलेला ढकलून दिले. तिचा मुलगा मध्यस्थी करण्यास आला असता, शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. २४ मे रोजी सकाळी ही घटना घडली. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी मयूर व त्याच्या आईविरुद्ध भादंविचे कलम ३२४, ५४०, ५०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-------------

हिरापूर येथे विवाहितेचा छळ

तळेगाव दशासर : नजीकच्या हिरापूर येथे २३ वर्षीय विवाहितेने सासरी छळ होत असल्याची तक्रार तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात २४ मे रोजी दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी विकेश अशोक हाडके (३०) व एका महिलेविरुद्ध भादंवि कलम ४९८ अ, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------

युवकाला जिवे मारण्याची धमकी

चांदूर रेल्वे : शहरातील शिवाजीनगर परिसरातील कुणाल श्रीकृष्ण सहारे (२०) याने स्वप्निल ज्ञानेश्वर ढोके (२५) याला काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली तसेच त्याच्या आईलाही काठीने मारले. बहिणीला गाडीवर कशाला नेले, या वादातून २४ मे रोजी मारहाण करण्यात आली. चांदूर रेल्वे पोलिसांनी कुणालविरुद्ध भादंविचे कलम ४५२, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला.

-----------------

भाजी विक्रेत्यांकडून संचारबंदीचे उल्लंघन

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विठ्ठल विश्वासराव वाघ (४०), राम विनायक मोहोळ (३०, दोन्ही रा. रुक्मिणीनगर), केदार अनंत झाडनगावकर (२७, रा. न्यू कॉलनी) यांनी संचारबंदीच्या कालावधीत भाजीविक्री सुरू ठेवल्याबद्दल फ्रेजरपुरा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. २४ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

------------

दुचाकीने फिरणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी दुचाकीने फिरत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. दिवाकर वाकोडे (५७, रा. प्रभा कॉलनी) हे एमएच २७ बीपी ५३८३ क्रमांकाच्या दुचाकीने यशोदानगर परिसरात आले होते. करण अनिल रंगारी (१८, रा. पंचशीलनगर) व अभिषेक रामराव चोरे (१८, रा. लुम्बिनी नगर) हे महादेवखोरी परिसरात एमएच २७ एएल ३४४७ क्रमांकाच्या दुचाकीने फिरत होते. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम १८८ सह साथरोग प्रतिबंधक अधिनियम अन्वय गुन्हा नोंदविला.

-------------------

व्यंकय्यापुरा येथील झोपडीची मोडतोड

अमरावती : फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकय्यापुरा येथे राजेश ऊर्फ बबलू रामदास वानखडे (४०), आदर्श प्रदीप शिंपी (२७, रा. व्यंकटेश कॉलनी), नितीन रामभाऊ काळे (३४, रा. विलासनगर), विक्रम राजेश तसरे (३१, रा. बेलोरा विमानतळ), गौतम सुरेश गवळी (रा. बेलोरा हिरापूर) हे झोपडीची मोडतोड करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ऋषिकेश गोंडी याने २३ मे रोजी राजेश वानखडे यांच्या चारचाकीच्या काचा फोडल्या होत्या. त्याचा वचपा काढण्यासाठी ही कृती केल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले. पोलिसांनी याप्रकरणी भादंविचे कलम १४३, १८८, ४२७, २६९, २७० तसेच साथ रोग अधिनियम अन्वये गुन्हा नोंदविला. २४ मे रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली

Web Title: City Kotwali Crimes against five persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.