नवगुन्हेगारांमुळे वाढली शहर पोलिसांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:09 AM2021-06-22T04:09:58+5:302021-06-22T04:09:58+5:30

(असायमेंट) अमरावती/ संदीप मानकर शहर पोलीस आयुक्तालयातील ठाण्यांंच्या हद्दीत यंदा गुन्ह्यांचा आलेख कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, ...

City police headaches increased due to new criminals | नवगुन्हेगारांमुळे वाढली शहर पोलिसांची डोकेदुखी

नवगुन्हेगारांमुळे वाढली शहर पोलिसांची डोकेदुखी

Next

(असायमेंट)

अमरावती/ संदीप मानकर

शहर पोलीस आयुक्तालयातील ठाण्यांंच्या हद्दीत यंदा गुन्ह्यांचा आलेख कमी झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, पोलिसांकडील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या यादीत काही नवीन गुन्हेगारांचीसुद्धा भर पडली आहे. शहरात घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. पाच महिन्यांत शहरात खुनाच्या सात घटना घडल्या. पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करून सदर गुन्हे उघडकीस आणले. राजापेठ हद्दीत गत दोन महिन्यांत खुनाच्या घटना घडल्या. एका घटनेत तर हिस्ट्रीशिटरला त्याच्या जुन्या मित्रांनी दगडाने ठेचून संपविले. खून, खुनाच्या प्रयत्नासह इतरही गुन्हेगारी वाढली असून, सायबर क्राईममध्ये तर थेट परराज्यातून गुन्हेगारी केली जाते व नागरिकांची लाखो रुपये ऑनलाईन पद्धतीने उडविले जातात. घरफोडी, चोरीच्या घटनांमध्ये इतर जिल्ह्यांतील आरोपींचासुद्धा सहभाग असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

अमरावती शहरात जानेवारी ते ३१ मे दरम्यान पाच महिन्यांत ३११ चोरीच्या घटना घडल्या. त्यापैकी ७२ चोऱ्या फक्त उघडकीस आल्या. घरफोडीच्या ८० घटना शहरात घडल्या. त्यापैकी फक्त १५ घटना उघडकीस आणण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. शहरात गंभीर स्वरूपाच्या पाच महिन्यांत खुनाच्या सात, तर खुनाच्या प्रयत्नाच्या १५ घटना घडल्या. एक दरोडा घडला होता.

शहरातील गुन्हेगारीचा आलेख असा

२०१९

घरफोडी -१७६

दरोडा-७

खून -२६

जिवे मारण्याचा प्रयत्न ६०

चोऱ्या-८७६

२०२०

घरफोडी- २२४

दरोडा -१

खून -२४

जिवे मारण्याचा प्रयत्न -६७

चोऱ्या- ८४४

२०२१ मे पर्यंत

घरफोडी -८०

दरोडा -१

जिवे मारण्याचा प्रयत्न १५

खून -७

चोऱ्या ३११

गुन्हेगारीत नवे चेहरे का आले?

१) गुन्हेगारीत नवीन चेहरे वाईट मित्रांच्या संगतीने येतात. काही जण झटपट पैसे कमाविण्यासाठी गुन्हेगारीकडे वळतात.

२) कुमार अवस्थेतील मुलांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास चांगले-वाईट यातील फरक त्यांना कळत नाही. यातूनच ते अल्पवयीन असल्यापासून गुन्हे करतात. शहरातील खुनाच्या काही गुन्ह्यांमध्ये काही अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.

३) काही तरुण शौक पूर्ण करण्यासाठी वाहनचोरी, घरफोड्या आणि लुटमारीसारखे गुन्हे करतात.

कोट

शहरात संघटित गुन्हेगारी नाही. पाच महिन्यांतील खुनाच्या घटना वेगवेगळ्या कारणांनी घडल्या. एका हिस्ट्रीशिटरचा खून झाला. घरफोडी करणाऱ्या टोळीला आम्ही पकडले. सराईत गुन्हेगारांवर आमची निगराणी आहे. अनेकांना तर तडीपार केले. यंदा गुन्ह्यांमध्ये नक्कीच घट झाली आहे.

आरती सिंह पोलीस आयुक्त अमरावती

कोट

डॉक्टरांचा कोट आहे.

,

Web Title: City police headaches increased due to new criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.