कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाला खुलेआम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:09 AM2018-07-06T01:09:29+5:302018-07-06T01:11:07+5:30

चौफुलीवर उभी असणारी दुचाकी रस्त्याच्या खाली घे, असे म्हटल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केली. सदरची घटना बुधवारी बडनेऱ्यातील जयस्तंभ चौकानजीक चौफुलीवर घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

The Civil Aviation Transport Police Opens Opposition | कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाला खुलेआम मारहाण

कर्तव्यावरील वाहतूक पोलिसाला खुलेआम मारहाण

Next
ठळक मुद्देदुचाकीस्वाराची गुंडागर्दी : गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : चौफुलीवर उभी असणारी दुचाकी रस्त्याच्या खाली घे, असे म्हटल्याने दुचाकीस्वाराने वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्याशी वाद घालून मारहाण केली. सदरची घटना बुधवारी बडनेऱ्यातील जयस्तंभ चौकानजीक चौफुलीवर घडली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
जयस्तंभ चौकालगत रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मार्गावरच्या चौफुलीवर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत दुचाकी उभी केली होती. त्याच चौफुलीवर वाहतूक शाखेचे अमोल नवखरे यांची ड्युटी होती. दुचाकी रस्त्याच्या खाली घे, असे म्हणताच दुचाकीस्वाराने नवखरे यांच्याशी हुज्जत घातली व मारहाण केली.
अमोल नवखरे यांनी रस्त्यावर उभी दुचाकीचा मोबाइलमध्ये फोटो घेताच, दुचाकीस्वाराने मोबाइल हिसकला आणि तेथून दुचाकी घेऊन पसार झाला. तक्रारीच्या आधारे बडनेरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३५३, १८६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. बडनेरा पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.
नागरिकांची बघ्याची भूमिका
कायद्याचे पालन करा, असे बजावणाऱ्या वाहतूक पोलीस शिपायाला एक दुचाकीस्वार धक्काबुक्की व मारहाण करीत असताना तेथे बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. एकट्या पोलिसाला मदत करण्यासाठी अर्धा तासापर्यंत कुणीही धजावले नाही. अखेर एक युवक त्यांच्या मदतीला धावून गेला.

Web Title: The Civil Aviation Transport Police Opens Opposition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.