सिव्हील पासआऊट, यादीत विद्युत अभियंते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:15 AM2021-07-14T04:15:58+5:302021-07-14T04:15:58+5:30
अमरावती : महापालिकेत पाच कंत्राटी अभियंते हे सिव्हील पदवीधारक असताना त्यांना सेवेत कायम करण्यासाठी चक्क विद्युत अभियंत्यांच्या यादीत दर्शविण्यात ...
अमरावती : महापालिकेत पाच कंत्राटी अभियंते हे सिव्हील पदवीधारक असताना त्यांना सेवेत कायम
करण्यासाठी चक्क विद्युत अभियंत्यांच्या यादीत दर्शविण्यात आले. आता हेच अभियंते सेवाज्येष्ठतेसाठी सरळसेवा पदोन्नतीच्या यादीत आणल्या गेले आहे. याप्रकरणी आयुक्तांकडे अन्यायग्रस्त अभियंत्यांनी तक्रार दिली आहे.
महापालिका प्रशासनाने १ जानेवारी २०२१ रोजी अंतिम सेवाज्येष्ठता यादी जारी केली. मात्र, या यादीत कंत्राटी असलेल्या पाच अभियंत्यांना सेवाज्येष्ठतेसाठी सरळसेवेतनू दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत अगोदर सरळसेवेद्धारे नोकरीत समाविष्ट झालेल्या अन्य अभियंत्यावर अन्याय होत असल्याची भावना तक्रारीतून स्पष्ट करण्यात आली आहे. शासन नियमांना डावलून मागासवर्गीय अभियंत्यावर अन्याय होत असल्याने तक्रारीत नमूद आहे, अंतिम सेवाज्येष्ठता यादी तयार करताना महापालिका सामान्य प्रशासनाने नियम वेशीवर टांगल्याचा आक्षेप घेतला आहे. पाच कनिष्ठ अभियंत्यांची सेवा तात्पुरती आणि खंडीत स्वरूपाची असताना त्यांना सरळसेवा यादीत कसे नमूद करण्यात आले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. अन्यायग्रस्त सहायक अभियंता दिेनेश हंबर्डे, शैलेल बोरकर, लक्ष्मण पावडे यांनी महापालिका आयुक्तांसह नगर विकास विभागाचे अवर सचिव, विभागीय आयुक्त, महापौर, गटनेता, मागासवर्गीय कक्ष, जिल्हाधिकारी आदींना निवेदनाद्धारे न्यायाची मागणी केली आहे.
-----------------
अभियंते हे महापालिकेतील आहे. दोन्ही बाजू तपासल्या जातील. कोणावरही अन्याय होणार नाही, याच काळजी घेण्यात येणार आहे. शासन नियमानुसारच कार्यवाही केली जाईल.
- प्रशांत रोडे, आयुक्त महापालिका.