दहावी, बारावी विद्यार्थ्यांच्या 17 नंबर फॉर्मसाठी मुदतवाढ, 15 सप्टेंबरची 'डेडलाईन'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 05:32 PM2017-09-04T17:32:12+5:302017-09-04T17:32:27+5:30
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
अमरावती, दि. 9 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2018 मध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी 17 नंबरचा अर्ज करून जे विद्यार्थी बहि:शाल पद्धतीने परीक्षा देतात, अशा विद्यार्थ्यांसाठी मंडळाने या वर्षापासून ऑनलाइन अर्ज भरण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर असल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाने दिली आहे.
दहावी-बारावीसाठी बहि:शाल पद्धतीने परीक्षा देण्याची सोय शिक्षण मंडळाने केली आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 1 ते 15 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेल्या महाविद्यालयांत तो जमा करावयाचा आहे. महाविद्यालयांनी हे अर्ज 26 सप्टेंबरपर्यंत विभागीय कार्यालयांमध्ये जमा करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन विभागीय शिक्षण मंडळाने केले आहे.