इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीस ‘असहकार’

By Admin | Published: March 1, 2017 12:10 AM2017-03-01T00:10:03+5:302017-03-01T00:10:03+5:30

क निष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या ....

Class XII Paper Checking 'Non-Cooperation' | इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीस ‘असहकार’

इयत्ता १२ वीच्या पेपर तपासणीस ‘असहकार’

googlenewsNext

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा पवित्रा : प्रलंबित मागण्या पूर्ण करा
अमरावती : क निष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या आश्वासित व मान्य मागण्यांची पूर्तता व अंमलबजावणीसाठी ३ मार्चपासून सुरु होणाऱ्या इयत्ता १२ वी पेपर तपासणीस ‘असहकार’ पवित्रा घेण्याचा निर्णय कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी घेतला आहे. याबाबतचे निवेदन शिक्षक संघटनेच्यावतीने विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांना देण्यात आले आहे.
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा मागण्या दीर्घकाळ प्रलंबित असून बैठकीत सर्व मागण्यांची पूर्तता महिनाभरात करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्याची पूर्तता न झाल्याने डिसेंबर २०१६ मध्ये आंदोलन करण्यात आले आहे. त्यानंतर जोनवारीमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले. त्यावेळी १५ दिवसात मागण्यांची पूर्तता केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. मात्र शासन, शिक्षण विभागाने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, असा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षकांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे शिक्षक आयुक्तपद रद्द करावे, अशी मागणीसह अन्य मागण्यांच्या पुर्ततेसाठी शिक्षक महासंघाने असहकार आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. शिक्षक दररोज एक पेपर तपासणार असून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक दररोज एक उत्तर पत्रिका तपासतील व त्याचे नियमन करतील, असा असहकार आंदोलनाचा भाग असल्याचे शिक्षक संघटनांनी स्पष्ट केले आहे. यासर्व बाबीला शासन जबाबदार राहील, असेही निवेदनातून म्हटले आहे.
दहावी, बारावीसाठी१० भरारी पथके!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) २८ फेब्रुवारी ते मार्च या कालावधीत होत आहे. माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता दहावी ७ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत होत आहे. या परीक्षा होऊ घातलेल्या केंद्रावर कॉपीसारखे गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे व शिक्षण विभाग तसेच शिक्षण मंडळाने जवळपास १० पथके तयार केली आहेत.
इयत्ता बारावीच्या परीक्षा जिल्ह्यातील १२५ परीक्षा केंद्रावर होत आहे. एकूण ४२ हजार ५३ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबविण्यात येत. उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली काही भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय शिक्षण विभाग आणि शिक्षण मंडळाचे भरारी पथकांचाही वॉच राहणार आहे. या पथकांना जिल्ह्यातील केंद्रांवर जाऊन परीक्षेच्या वेळी होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून दिल्या आहेत.

अशा आहेत प्रमुख मागण्या
आॅनलाईन संच मान्यतेतील तृट्या दूर करण्यात याव्या. प्रचलित निकषानुसार संच मान्यता द्यावी. कायम अनुदानित तत्वावरील मुल्यांकनास पात्र महाविद्यालयांना अनुदान देण्यात यावे. सन २०११-१२ पासून वाढीव पदांना त्वरित मान्यता द्यावी. इयत्ता अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशात प्रथम तीन फेऱ्या अनुदानित कराव्यात. कनिष्ठ महाविद्यालयांचे प्रशासन स्वतंत्र करावे. २००५ नंतरच्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. शिक्षक सेवक योजना करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांच्या विनाअनुदानित शिक्षकांनी मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामावर बहिष्कार टाकण्याबाबतचे पत्र दिले आहे. मात्र पेपर तपासणीसाठी अनुदानित, कायम अनुदानित अशा दोन्ही शिक्षकांचे आदेश काढले आहेत. मात्र पेपर तपासणीला अुदानित शिक्षकांना प्राधान्य दिले जाईल.
- संजय यादगिरे, सचिव, विभागीय शिक्षण मंडळ, अमरावती.

Web Title: Class XII Paper Checking 'Non-Cooperation'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.