चिखलातून पोहचली अंत्ययात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 10:42 PM2018-06-11T22:42:44+5:302018-06-11T22:42:54+5:30
येथील वादग्रस्त स्मशानभूमीचा विषय अधिक जटील झाला असून रस्त्याअभावी सोमवारी चिखलातून स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवीत माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृतदेह गावकऱ्यांना न्यावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गुरूकुंज (मोझरी) : येथील वादग्रस्त स्मशानभूमीचा विषय अधिक जटील झाला असून रस्त्याअभावी सोमवारी चिखलातून स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवीत माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मृतदेह गावकऱ्यांना न्यावा लागला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
गुरुकुंजातील डॉ. श्रीकृष्ण माहुलकर (६८) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले होते. पण स्मशानभूमित जाण्याकरिता रस्ताच नाही मग पोहचणार कसे, हा सवाल ग्रामस्थांनी व्यक्त केला. बैलबंडी जाणे शक्यच नसल्याने अंत्यविधीसाठी लागणारी लाकूडफाटा चक्क चिखलातून खांद्यावर वाहून न्यावी लागली. त्यामुळे हा नाहक मन:स्ताप ग्रामस्थांना सहन करावा लागला. असाच प्रकार काही दिवसांपूर्वी गुरुकुंज येथे घडला असून, चक्क बसस्थानकापुढे संतप्त गावकºयांनी अंत्यसंस्कार उरकविले होते. कारण त्याच ठिकाणी जुनी समशानभूमी होती. आताही तीच परिस्तिथी निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या दमदार पावसामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, ग्राम प्रशासन, तहसील प्रशासनामार्फत यावर कुठलीच व्यवस्था अद्यापही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही नागरिक लाखो रुपये खर्चून उभारलेल्या स्मशानभूमीचा रस्ता शोधत आहे. हाच मुद्दा येत्या निवडणुकीत विरोधकांच्या हाती कोलीत देण्यासाठी पुरेशा असून, त्यादृष्टीने गावकºयांच्या होणाºया हालअपेष्टा शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न सोशल मीडियातून चालविला आहे, हे विशेष.