स्वच्छ कारभाराची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 11:08 PM2017-09-12T23:08:31+5:302017-09-12T23:08:31+5:30

मागील चार वर्षांचा आढावा घेता सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी न्यायालयीन प्रक्रियेमध्येच अधिक वेळ घालविला, ....

Clean commitment | स्वच्छ कारभाराची ग्वाही

स्वच्छ कारभाराची ग्वाही

Next
ठळक मुद्देबाळासाहेब सपकाळ : न्यायालयीन प्रक्रियेमुळेच संस्था माघारली

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मागील चार वर्षांचा आढावा घेता सत्ताधारी व विरोधक या दोन्ही बाजूंनी न्यायालयीन प्रक्रियेमध्येच अधिक वेळ घालविला, यामुळे राज्यातील आघाडीची असणाºया या शिक्षण संस्थेची प्रगती माघारली, आम्ही भयमुक्त व स्वच्छ कारभार देऊ, अशी ग्वाही बाळासाहेब सपकाळ यांनी दिली.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विकास पॅनेलचा जाहीरनामा काय, यावर ते बोलत होते. केवळ एका ओळीच्या ठरावाला आमसभेची मंजुरात पाहिजे, म्हणजे कंपणीचा मुद्दा निकाली निघतो व पुढचे त्रास वाचतात. सन २०१२ मधील निवडणुकीत याच मुद्यावर रस्सीखेच सुरू होती. गेल्या चार वर्षांपासून हा मुद्दा कोर्टात सुरू असल्यामुळे या काळात संस्थेची प्रगती खुंटली, ही वस्तुस्थिती आहे. यापुढे कंपनीला मतदान व उभे राहण्याचा अधिकार राहणार नाही, अशी घटनेत तरतूद करावी लागेल,असे सपकाळ यांनी सांगितले.
या सर्व न्यायालयीन प्रक्रियेत संस्थेचा वेळ खर्ची पडला. संस्थेत नवीन कोर्सेस सुरू झालेली नाहीत. या सर्व भानगडीत युवा पिढीचे नुकसान होत आहे. राज्यात कधी अग्रणी असलेली संस्था ‘सिंबायसीस’ का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. संस्थेत सर्व साधने उपलब्ध असताना काहीही अशक्य नाही. मात्र, यासाठी नियोजन व व्हिजन असावे लागते, असे सपकाळ यांनी सांगितले.
संस्थेच्या आजीवन सभासदांच्या पाल्यांना वारस हा तांत्रिक शब्द टाकून घटनेत तरतूद नाही म्हणून सभासद करता येत नाही, हा सोयीस्कर पर्याय सत्ताधाºयांनी निवडला. वास्तविकता शिवपरिवारातील नवीन पाल्यांना सभासद करने सहज शक्य आहे.मात्र वारस या शब्दाचा वापर करून सोईस्कर गुंतागुंत करण्यात आली. वारसांना हक्क नाही आदी केवळ बतावनी आहे. शिव परिवारातील पाल्यांना नवीन सभासद करण्यात कोणतीही अडचण नाही. मात्र याविषयीची सतत दिशाभूल करण्यात येत असल्यांचे सपकाळ यांनी सांगितले.
नुसत्या इमारती बांधून प्रगती होत नसते, तर नव्या युगाचे अभ्यासक्रम आणून विद्याथ्यांचे हित साधायला पाहिजे, संस्थेच्या उत्पन्नत वाढ झाली ती नैसगीक आहे. मूल्यांकन (नेटवर्थ) हे नैसर्गिकरीत्या वाढले. यामध्ये सत्तापक्षाचा कवडीचाही सहभाग नाही, असे सपकाळ यांनी सांगितले.
भाऊसाहेबांनी विणलेली शिवपरिवाराची वीण कायम ठेवू
संस्थेच्या आजीवन सदस्यांना प्राधान्य दिले जात नाही. त्याऐवजी राजकीय लोकांना दिले जाते, ही दु:खाची बाब आहे. आम्ही त्यांना प्राधान्य देऊ संस्थेच्या कारभारात त्याचा सहभाग व मार्गदर्शन घेऊ, त्यांच्या आरोग्यासंदर्भात सुविधा देऊ. त्यांच्या पाल्यांना प्रवेशासंदर्भात प्राधान्य देऊ, असे सपकाळ यांनी सांगितले. भाऊसाहेबांनी विणलेली शिवपरिवाराची विण कायम ठेवू, असेही ते म्हणाले. शेतकºयांना सुविधा देणे आपले हे नैतिक कर्तव्य असल्याने कृषी महाविद्यालयाच्या मार्फत उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Clean commitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.