आयकर विभागाचे ‘स्वच्छ धन अभियान’
By admin | Published: February 17, 2017 12:24 AM2017-02-17T00:24:42+5:302017-02-17T00:24:42+5:30
आयकर विभागाने करदात्यांना तक्रारींचे आॅनलाईन स्पष्टीकरण देण्यासाठी ‘स्वच्छ धन अभियान’ सुरू केले आहे.
आॅनलाईन तक्रार : नोटीसनंतर १० दिवसांत स्पष्टीकरण
अमरावती : आयकर विभागाने करदात्यांना तक्रारींचे आॅनलाईन स्पष्टीकरण देण्यासाठी ‘स्वच्छ धन अभियान’ सुरू केले आहे. करदात्यांना नोटीस प्राप्त झाल्यापासून १० दिवसांत स्पष्टीकरण द्यावे लागेल.
केंद्र सरकारने हजार व ५०० रूपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर त्याबँकेत जमा करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत बँकेत जमा झालेल्या नोटांची माहिती आयकर विभागाने घेतली आहे. त्याअनुषंगाने रोख रक्कम जमा करणाऱ्या व्यक्तीची माहिती आयकर विभागाशी जुळत नसल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा व्यक्तिंसाठी आयकर विभागाने ‘आॅनलाईन व्हेरिफिकेशन वेबसाईट’ तयार केली आहे. या ‘वेब पोर्टल’मध्ये ‘लॉग इन’ करून ‘कंम्प्लायन्स सेक्शन’मध्ये ‘कॅश ट्रान्झॅक्शन २०१६’ या लिंकवर बघण्याची सुविधा आयकर विभागाने उपलब्ध केली आहे. त्यामुळे करदात्यांना आयकर विभागात न येता आॅनलाईन स्पष्टीकरण देता येणार आहे. त्याकरिता ई-मेल,एसएमएसची सोय देखील करण्यात आली आहे. ज्या करदात्यांची ई-फायलिंग पोर्टलवर नोंदणी नाही,