स्वच्छता ‘ब्रँड अॅम्बेसिडरच्या आज ‘कॉलेजियन्स’शी गुजगोष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 11:52 PM2017-11-28T23:52:51+5:302017-11-28T23:53:12+5:30
महापािलकेचे स्वच्छता ब्रँड अॅम्बेसिडर तथा अभिनेता भारत गणेशपुरे २९ व ३० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधारण आहेत.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : महापािलकेचे स्वच्छता ब्रँड अॅम्बेसिडर तथा अभिनेता भारत गणेशपुरे २९ व ३० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधारण आहेत. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह शहरातील अन्य महाविद्यालयांतील तरुणार्इंशी गुजगोष्टी करणार आहेत.
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अनुषंगाने अमरावती शहर स्वच्छ शहराच्या मानांकनात अग्रक्रमावर यावे, या हेतूने प्रसिद्ध अभिनेता भारत गणेशपुरे यांची बँ्रड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली. स्वच्छतेमध्ये लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा असून तो वाढविण्यासाठी गणेशपुरेंची प्रतिमा वापरली जाणार आहे. आयुक्त हेमंतकुमार आणि स्थायी समिती सभापती तुषार भारतीय यांच्या संयुक्त प्रयत्नातून भारत गणेशपुरे यांनी ब्रँड अॅम्बेसिडर होण्यास होकार दर्शविला. त्या अनुषंगाने आपले अमरावती स्वच्छ ठेवण्यासाठी गणेशपुरे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साद घालणार आहेत. महत्तम लोकसहभागातून स्वच्छ अमरावती साकारण्यासाठी व कचरा विलगीकरणाचा मंत्र गणेशपुरे देणार आहेत. शहराची वाढती लोकसंख्या, महापालिकेचे अल्प मनुष्यबळ आणि अत्यल्प साधनसामग्रीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेत अमरावतीकरांनी सहकार्य करावे, असे आवाहन गणेशपुरे करणार आहेत.
२९ नोव्हेंबरला सकाळी १० वाजता गणेशपुरे नुतन कन्या विद्यालय व महिला महाविद्यालय व दुपारी १२ वाजता केशरबाई लाहोटीमध्ये संवाद साधतील.बुधवार आणि गुरुवारी होणाºया या संवादपर्वात महापालिका पदाधिकारी व अधिकारी सहभागी होणार आहेत.
३० नोव्हेंबरलासकाळी १० वाजता भारत गणेशपुरे भारतिय महाविद्यालय, दुपारी १ वाजता अमरावती विद्यापिठ व त्यानंतर दुपारी ४ वाजता महापालिकेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पदाधिकारी व माध्यमांशेी संवाद साधतील .या संवादाची जबाबदारी विविध अधिकाºयांवर सोपविण्यात आली.
जानेवारी २०१८ मध्ये अमरावती महापालिका ४००० गुणांच्या स्वच्छ सर्वेक्षणास सामोरे जात असून यंदा पहिल्या शंभर क्रमांकामध्ये येण्याचा संकल्प महापालिका पदाधिकारी व प्रशासनाने केला आहे.