संत निरंकारी मिशनद्वारा स्वच्छतेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 09:55 PM2018-02-24T21:55:53+5:302018-02-24T21:55:53+5:30

संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या ६४ व्या जयंत्युत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ७ वाजता येथील इर्विन रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

Cleanliness of Cleanliness by Saint Nirankari Mission | संत निरंकारी मिशनद्वारा स्वच्छतेचा जागर

संत निरंकारी मिशनद्वारा स्वच्छतेचा जागर

Next
ठळक मुद्देबाबा हरदेव जयंत्युत्सव : इर्विन रुग्णालयात राबविले सफाई अभियान

आॅनलाईन लोकमत
अमरावती : संत निरंकारी मिशनचे प्रमुख बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या ६४ व्या जयंत्युत्सवानिमित्त शनिवारी सकाळी ७ वाजता येथील इर्विन रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यामध्ये संपूर्ण वॉर्डांतील स्वच्छता करून बाबा हरदेवसिंग महाराजांना आदरांजली वाहण्यात आली. या स्तुत्य उपक्रमाला महापौर संजय नरवणे, महापालिका आयुक्त हेमंतकुमार पवार, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, नगरसेवक श्रीचंद तेजवानी आदींनी वॉर्डांत भेटी देऊन मिशनच्या कार्याची प्रशंसा केली.
या अभियानात निरंकारी मिशनचे २५० सेवादल स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. यावेळी सर्व वॉर्डांमध्ये विभाजित होऊन सफाईचे साहित्यासह सर्व सेवादल दाखल झालेत. तेथील सर्व शौचालय, बाथरूम, वॉर्डांची अ‍ॅसिड, फिनाईल व वॉशिंग पावडरने धुऊन स्वच्छता करण्यात आली. बाबा हरदेवसिंग महाराज यांच्या हयातीत त्यांच्या जयंतीप्रीत्यर्थ निरंकारी मिशनतर्फे जगभरात निर्माण झालेल्या शाखांद्वारा सार्वजनिक स्थळांची स्वच्छता करण्यात येत होती. 'प्रदूषण अंदर हो या बाहर, दोनो घातक है', हे बाबाजींचे घोषवाक्य आहे. तीच परंपरा अव्याहतपणे सुरू ठेवण्याचे निर्देश माता सविंदर हरदेव महाराज यांनी सर्व संयोजकांना दिल्याने हे उपक्रम सर्वत्र राबविण्यात आले. याप्रसंगी पुरुषोत्तम बजाज, अमरावतीचे संयोजक महेशलाल पिंजानी, बडनेºयाचे संयोजक हरीशलाल बजाज, प्रचारक महात्मा किशन बोधानी, देविदास गेडाम, मुकेश मेघानी, सेवादल संचालक अशोक टिंडवानी, संजय खडसे, धनंजय क्षीरसागर, मनोज नानवानी, लीलाधर कुडे, मुकेश गंगवानी, रवि बजाज, माया बोधानी, अनिता मुलानी, दीपा बजाज, सतीश पटेल, बबलू ठाकूर, विजय खंडारे, महेश दलवानी, माधव पिंजानी, भारती पिंजानी, निखिल पिंजानी आदी सेवादल स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.

Web Title: Cleanliness of Cleanliness by Saint Nirankari Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.