शेंडगावात विभागीय आयुक्तांनी केली सफाई
By Admin | Published: February 24, 2016 12:11 AM2016-02-24T00:11:55+5:302016-02-24T00:11:55+5:30
स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या शेंडगाव या कर्मभूमीमध्ये विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी ग्राम स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली.
संत गाडगेबाबा जयंत्युत्सव : २६ रोजी मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
कोकर्डा (शेंडगाव) : स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांच्या शेंडगाव या कर्मभूमीमध्ये विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी ग्राम स्वच्छता मोहिमेला सुरूवात केली. संत गाडगेबाबांच्या जन्मोत्सवानिमित्त हा ुउपक्रम राबविला जात आहे.
यावेळी विभागीय आयुक्तांनी २६ फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या ज्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे, त्या परिसराची पाहणी करून एकूण आढावा घेतला.
यावेळी त्यांच्यासोबत उपविभागिय अधिकार इब्राहीम चौधरी, अंजनगावचे तहसीलदार प्रदीप पवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, अंजनगाव पंचायत समिती सभापती विनोद टेकाडे, दर्यापूर व अंजनगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकारी, महसूल कर्मचारी, अंजनगाव व दर्यापूर येथील विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
सी.एम.कढी महाविद्यालय, अचलपूर कॅम्प, जगदंबा महाविद्यालय अचलपूर, महात्मा फुले महाविद्यालय भातकुली, दादासाहेब महाविद्यालय पथ्रोट गावकऱ्यांनी देखील स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. (प्रतिनिधी)