शहानूर नदीची केली स्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:06 PM2017-12-22T23:06:24+5:302017-12-22T23:06:52+5:30
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
आॅनलाईन लोकमत
अंजनगाव सुर्जी : संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहानूर नदीपात्राची स्वच्छता लोकजागर संघटनेकडून करण्यात आली.
नदी स्वच्छता अभियानानिमित्त बंडू हंतोडकर, उमेश घोगरे, डॉ. हरीश पटेल, रवि गावंडे, प्रमोद काळे, सतीश लोणकर, किस्मत अली, अ. अजीज शे. रहीम ग्रेडर, शमी खान शफीखान यांनी जे.सी.बी. सोय उपलब्ध करून दिल्यामुळे नदीपात्र स्वच्छता अभियानाने वेग घेतला. मुख्याधिकारी योगेश कुंभेजकर, तहसीलदार पुरुषोत्तम भुसारी तथा नगराध्यक्ष कमलकांत यांनीदेखील मोहिमेत सहकार्य दिले. संघटनेच्या माध्यमातून गतवर्षी लोकसहभागातून रेल्वे स्टेशन, बसस्थानक व रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली.
स्वच्छता रॅली
काठीपुरा येथील गाडगेबाबांच्या पुतळ्यापासून सकाळी ७.३० पासून स्वच्छता रॅली निघाली. तहसीलदार, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते, शिक्षक, शासकीय कर्मचारी तसेच प्रत्येक प्रभागातून ८० स्वच्छतादूत व नागरिक स्वयंसेवक म्हणून सामील झाले.
स्वच्छतेसाठी आधुनिक व्हा
शहरातील नागरिकांनी निरोगी, निरामय परिसराकरिता स्वच्छ परिसरासोबतच कचरा घंटागाडीतच टाकावा तसेच रोडवर साचलेला कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेमार्फत सुरू केलेल्या स्वच्छता अॅपचा उपयोग करावा, अशी विनंती लोकजागर संघटनेने केली आहे. यावेळी त्यासंदर्भातही मार्गदर्शन व जागर करण्यात आला.